मराठी बातम्या /बातम्या /देश /धक्कादायक! NEET परीक्षेआधी तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या

धक्कादायक! NEET परीक्षेआधी तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या

 नीट परीक्षेआधी केंद्र कोणतं आलं आहे हे पाहण्यासाठी आई-वडील पाहायला गेले असताना आदित्यने आत्महत्या केली.

नीट परीक्षेआधी केंद्र कोणतं आलं आहे हे पाहण्यासाठी आई-वडील पाहायला गेले असताना आदित्यने आत्महत्या केली.

नीट परीक्षेआधी केंद्र कोणतं आलं आहे हे पाहण्यासाठी आई-वडील पाहायला गेले असताना आदित्यने आत्महत्या केली.

चेन्नई, 13 सप्टेंबर : NEET परीक्षा आज पार पडत असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. परीक्षेपूर्वी तीन विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. शनिवारी 3 जणांनी आत्महत्या केल्यामुळे NEET परीक्षेवरून पुन्हा एकदा राजकीय नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आत्महत्या करणाऱ्यांचं वय 19 ते 21 वर्ष असल्याची माहिती मिळाली आहे.

ही घटना तमिळनाडूमधील मदुरै इथे 19 वर्षाच्या तर धर्मपुरी इथे 20 वर्षाच्या युवकानं आत्महत्या केली आहे. यापूर्वी 2017 मध्ये एका विद्यार्थिनीने NEET परीक्षा पास न झाल्याच्या धक्क्यातून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. या तरुणीनं 12 वीमध्ये उत्तम मार्क मिळवले होते पण केवळ नीटमध्ये स्कोअर करता आला नाही म्हणून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता.

नमकक्ल जिल्ह्यात 21 वर्षाच्या युवकानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या युवकानं दोन वेळा नीट दिली होती. या युवकानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास केला. त्यावेळी सुसाईड नोट सापडली. दोन वेळा नीट परीक्षा पास होऊ न शकल्यानं आत्महत्या करत असल्याचं या चिठ्ठीत तरुणानं उल्लेख केला होता.

धर्मपुरी इथे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आदित्य असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. नीट परीक्षेआधी केंद्र कोणतं आलं आहे हे पाहण्यासाठी आई-वडील पाहायला गेले असताना आदित्यने आत्महत्या केली. रविवारी NEE परीक्षा देण्यासाठी त्याला परीक्षा केंद्रावर उपस्थित राहाणं गरजेचं होतं. मात्र त्याआधीच त्यानं हे धक्कादायक पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

First published:
top videos