क्लास सुरू असलेल्या इमारतीला भीषण आग; सामान्यांतल्या हीरोंमुळे अलगद वाचले विद्यार्थी! पाहा VIDEO
विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या आधी रस्त्यावरचे सामान्य नागरिक सरसावले. सामान्यांमधल्या हीरोंमुळे विद्यार्थी कसे वाचले याचा VIDEO आता व्हायरल होत आहे.
जामनगर (गुजरात), 3 मार्च : कमर्शियल कॉम्प्लेक्सला लागलेल्या एका भीषण आगीत अनेक विद्यार्थी अडकले होते. चहूबाजूंनी आग वाढत होती, विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या आधी रस्त्यावरचे सामान्य नागरिक सरसावले. सामान्यांमधल्या हीरोंमुळे विद्यार्थी कसे वाचले याचा VIDEO आता व्हायरल होत आहे.
गुजरातच्या जामनगरमध्ये ही घटना घडली. एका कमर्शियल कॉम्प्लेक्सला आग लागली. या कॉम्प्लेक्समध्ये काही दुकानं होती आणि ऑफिसेससुद्धा. राधे कृष्णा कॉम्प्लेक्स नावाच्या या इमारतीला अचानक आग लागली. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अचानक आग लागली. झपाट्याने आग भडकली आणि पहिल्या मजल्यावरच्या मोठ्या हॉलमध्ये असणाऱ्या ट्युशन क्लासेसला पहिली झळ बसली. एका मोठ्या हॉलमध्ये इथे ट्युशन क्लासेस चालतात. या आगीत ट्युशन क्लासेसचे विद्यार्थी वर्गातच अडकले. बाहेर पडायच्या दारातच आगीने उग्र रूप धारण केल्याने त्यांचा सुटकेचा मार्ग बंद झाला. पण स्थानिक लोकांनी धैर्याने पुढाकार घेतला आणि अडकलेल्या विद्यार्थ्यांना अक्षरशः अलगद बाहेर काढलं. या बचाव कार्याचा व्हिडिओ सोळ मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकांच्या या धैर्याचं कौतुक होत आहे.
सामान्यांतल्या हीरोंमुळे वाचले विद्यार्थी! गुजरातच्या जामनगरमध्ये एका कमर्शियल कॉम्प्लेक्सला आग लागली. तिथे असलेल्या ट्युशन क्लासेसचे विद्यार्थी आत अडकले. पण स्थानिक लोकांनी धैर्याने पुढाकार घेतला आणि अडकलेल्या विद्यार्थ्यांना अक्षरशः अलगद बाहेर काढलं. - 1 pic.twitter.com/8f7JABZLAQ
त्यांनी विद्यार्थ्यांना खिडकीच्या बाजून थेट पहिल्या मजल्यावरून उडी मारायला सांगितली. खाली विद्यार्थ्यांना अलगड पकडण्यासाठी काही तरुण उभे राहिले. तर काही जण तिथूनच वर चढले. अग्निशमन दलाचे जवान येण्यापूर्वीच त्यांनी हे बचावकार्य सुरू केलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. धुरामुळे अनेक विद्यार्थी गुदमरून जाण्याचा धोका या हीरोंमुळे टळला.
या घटनेची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सामान्यांतल्या हीरोंमुळे वाचले विद्यार्थी! गुजरातच्या जामनगरमध्ये एका कमर्शियल कॉम्प्लेक्सला आग लागली. तिथे असलेल्या ट्युशन क्लासेसचे विद्यार्थी आत अडकले. पण स्थानिक लोकांनी धैर्याने पुढाकार घेतला आणि अडकलेल्या विद्यार्थ्यांना अक्षरशः अलगद बाहेर काढलं. -2 pic.twitter.com/HknwxE9nKl