इंग्रजीत घडाघडा बोलणाऱ्या 70 वर्षांच्या आजीला शशी थरूर किती मार्क देणार?

इंग्रजीत घडाघडा बोलणाऱ्या 70 वर्षांच्या आजीला शशी थरूर किती मार्क देणार?

घडाघडा इंग्रजीत बोलणाऱ्या या आजींची सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा होत आहे.

  • Share this:

मुंबई, 02 मार्च: आपल्याला इंग्रजीत बोलायचं म्हटलं की त-त-प-प होतं काही वेळा तर बोबडी वळते. मात्र 70 वर्षांच्या या आजींचा घडाघडा इंग्रजीत बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या आजींचं इंग्रजी ऐकून आपल्याही तोंडातून क्या बात है! असे उद्गार आल्याशिवाय राहणार नाहीत. या आजी महत्मा गांधीजींबद्दल सांगत आहेत असं या व्हिडीओतून आपल्या लक्षात येईल. सोशल मीडियावर युझर्सनी शशी थरूर यांचं लक्ष या व्हिडीओकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे. शशी थरूर या आजींना त्यांनी इंग्रजीत सांगितलेल्या माहितीसाठी 10 पैकी किती मार्क देतील? असा सवाल उपस्थित केला आहे. तर आयपीएस ऑफिसरनेही हा प्रश्न विचारत आपल्या अकाऊंटवर हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

आजींच्या हा व्हिडीओ 1 मार्चला शेअर करण्यात आला होता. 2.8 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर 15 हजारहून अधिक लोकांनी या व्हिडीओला शेअर केलं आहे. शशी थरूर यांना किती मार्क देतात हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे असं आयएएस ऑफिसर अरुण बोथरा यांनी म्हटलं आहे.

First published: March 2, 2020, 9:12 PM IST

ताज्या बातम्या