Home /News /viral /

तरुणाने स्वत:ची चिता पेटवली आणि त्यावरच झोपला, वाचवण्याऐवजी लोकांनी शूट केला VIDEO

तरुणाने स्वत:ची चिता पेटवली आणि त्यावरच झोपला, वाचवण्याऐवजी लोकांनी शूट केला VIDEO

तरुणाने स्वत:च चिता रचून ती पेटवली आणि त्यावर झोपला तेव्हा पाहणाऱ्या लोकांनी त्याला थांबवण्याऐवजी घटनेचे शूटिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

    लखनऊ, 02 मार्च : माणसं हल्ली माणुसकी विसरत चालली आहेत की काय असा प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल होणाऱे व्हिडिओ पाहिले की पडतो. एखाद्याला मदतीची गरज असताना पुढे होऊन मदत करण्याऐवजी लोक फोटो आणि व्हिडिओ शूट करण्यात धन्यता मानतात. आता असाच एक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील कुशीनगर इथं एक जिवंत व्यक्ती चितेवर जळत असताना लोकांनी काही हालचाल न करता त्याचा व्हिडिओ शूट केला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कुशीनगरच्या रामकोला ठाण्याचा हद्दीत बसडीला गाव आहे. गावात दारुच्या नशेत असलेल्या तरुणाने स्वत:ची चिता रचली. त्यानंतर चितेला आग लावून त्यावर झोपला. यामध्ये तरुण होरपळला आहे. त्याला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये तरुणाने चार फुट उंचीची चिता रचल्याचं दिसत आहे. त्यावर बाजलं टाकून तरुण झोपला असल्याचं दिसतं. खालून चितेला आगही लावली आहे. तरुण हे सर्व करत असताना त्याठिकाणी अनेक लोक होते असंही सांगितलं जात आहे. हे वाचा : जीवघेणा खेळ, tik tok करताना शूट झाला तरुणाच्या मृत्यूचा थरारक LIVE VIDEO तरुण स्वत:ची चिता रचून त्याला आग लावल्यानंतर वर झोपला तरी लोकांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. काहींनी तर त्याचा व्हिडिओसुद्धा केला. त्याला कोणीच न अडवल्यानं आगीत तरुण भाजला आहे. तरुणाने हे पाऊल का उचललं हे मात्र समोर आलेलं नाही. हे वाचा : नको रे बाबा Corona होईल ! भीतीपोटी हाताऐवजी पायाचा वापर, व्हिडीओ व्हायरल
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Viral

    पुढील बातम्या