मराठी बातम्या /बातम्या /देश /EXIT POLL 2019 : बहुतांश सर्व्हेमध्ये काँग्रेस EXIT, फिर एक बार मोदी सरकार

EXIT POLL 2019 : बहुतांश सर्व्हेमध्ये काँग्रेस EXIT, फिर एक बार मोदी सरकार

विविध माध्यम संस्थांनी आणि सर्वेक्षण एजन्सीच्या मदतीने केलेल्या EXIT POLL मध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.  कुणाला किती जागा मिळतील पाहा...

विविध माध्यम संस्थांनी आणि सर्वेक्षण एजन्सीच्या मदतीने केलेल्या EXIT POLL मध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. कुणाला किती जागा मिळतील पाहा...

विविध माध्यम संस्थांनी आणि सर्वेक्षण एजन्सीच्या मदतीने केलेल्या EXIT POLL मध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. कुणाला किती जागा मिळतील पाहा...

    मुंबई, 19 मे : सतराव्या लोकसभेचं अखेरचं मतदान संपताच मतदानोत्तर चाचण्यांचे कौल हाती यायला सुरुवात झाली आहे. विविध माध्यम संस्थांनी आणि सर्वेक्षण एजन्सीच्या मदतीने केलेल्या EXIT POLL मध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. भाजपचं स्वबळावर सरकार स्थापनेचं स्वप्न मात्र पूर्ण होणार नाही, असं बहुतेक एक्झिट पोल मध्ये वर्तवलेल्या अंदाजावरून स्पष्ट झालं. दोन प्रमुख एक्झिट पोलमध्ये रालोआला 300 च्या जागा देण्यात आल्या आहेत.

    News18 ने IPSOS च्या मदतीने देशातला सर्वात विश्वसनीय Exit Poll केला आहे. त्यात देशातल्या जवळपास सर्वच राज्यातल्या मतदारांच्या मनाचा कौल जाणून घेण्यात आला आहे. त्याचा सविस्तर अंदाज लवकरच इथे देण्यात येईल. कुठल्या एक्झिट पोल्समध्ये किती आकड्याचा अंदाज वर्तवला आहे पाहा.

    असा आहे रिपब्लिकचा अंदाज

    भाजप+  NDA 305

    काँग्रेस + UPA 124

    सप-बसप महागठबंधन 26

    अन्य 87

    TV 9 एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीचं वर्चस्व

    लोकसभा निवडणुकीसाठी सर्व सात टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.

    'टीव्ही 9'च्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीला 38 तर महाआघाडीला केवळ 10 जागा मिळतील. महाआघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

    Times Now Exit Poll : एनडीएला 306 जागा

    लोकसभा निवडणूक 2019च्या सातही टप्प्यातील मतदान प्रकिया पार पडल्या आहेत. मतदानानंतर आता निकाल कोणाच्या बाजूनं लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. निकाल 23 मे रोजी स्पष्ट होणार आहेत. मात्र सातही टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर येऊ लागले आहेत. 'TIMES NOW'च्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 306 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

    स्वबळावर सरकार स्थापनेचं भाजपचं स्वप्न मात्र भंगण्याची चिन्ह या अंदाजात व्यक्त केलं आहे. भाजपला 262 जागा मिळाल्या आहेत.  त्यामुळे लोकसभा निवडणूक 2019मध्येही भाजप आणि भाजपच्या घटकपक्षाचीच हवा कायम राहणार असल्याचं चित्र 'TIMES NOW' च्या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.

    संबंधित बातम्या

    Exit Poll 2019 : तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांच्या TRS ला घवघवीत यश

    EXIT POLL : नांदेडमधून अशोक चव्हाणांना धोक्याची घंटा, काय आहे अंदाजEXIT POLL 2019 : आंध्र प्रदेशात काँग्रेसला धक्का, चंद्राबाबू आणि जगनमोहन रेड्डी यांच्यात चुरस

    First published:

    Tags: Congress, Election 2019, Lok sabha election 2019, Narendra modi, NDA