हैदराबाद, 19 मे : आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणूकही झाली. त्यामुळे या राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगु देसम आणि जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस पक्ष यांच्यात जोरदार लढत झाली. जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला १३ ते 14 जागा मिळतील तर तेलगु देसमला 10 ते 12 जागा मिळतील, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. त्यामुळे हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
2014 ची लोकसभा निवडणूक
आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण 25 जागा आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडूंच्या तेलगु देसम पक्षाने 15 जागा मिळवल्या तर जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला 8 जागा मिळाल्या. भाजप इथे 2 जागा मिळवू शकलं होतं.
पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष
आंध्र प्रदेशममध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांसाठी 11 एप्रिलला मतदान झालं. इथे तेलगु देसम आणि वायएसआर काँग्रेस यांच्यात थेट लढत असली तरी अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षने बहुजन समाज पक्ष आणि डाव्या पक्षांशी युती करत रिंगणात प्रवेश केला.
महत्त्वाचे उमेदवार
तेलगु देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, वायएसआर काँग्रेस पक्षाचे जगनमोहन रेड्डी, जनसेना पक्षाचे पवन कल्याण, चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश, अभिनेते एन. बालकृष्ण आणि काँग्रेसचे आंध्र प्रदेशमधले प्रदेशाध्यक्ष रघुवीरा रेड्डी हे या निवडणुकीतले महत्त्वाचे उमेदवार होते.
राजधानीत मोर्चेबांधणी
तेलगु देसमचे चंद्राबाबू नायडू गेले काही दिवस दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत. लोकसभेमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तर सरकारस्थापनेसाठी विरोधकांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून चंद्राबाबू नायडू प्रमुख नेत्यांच्या भेटीही घेत आहेत.
======================================================================
48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, आतापर्यंतच्या टाॅप 18 बातम्या, पाहा VIDEO