हैदराबाद, 19 मे : या लोकसभा निवडणुकीत चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. नेटवर्क 18 च्या एक्झिट पोलनुसार तेलंगणा राष्ट्र समितीला 11 ते 13 जागा मिळतील, असा अंदाज आहे. इथे भाजपला 1 ते 2 जागा मिळतील. काँग्रेसला 1 ते 2 जागा मिळतील तर MIM ला एक जागा मिळेल, असा हा अंदाज आहे. तेलंगणामध्ये लोकसभेच्या 17 जागा आहेत.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीला 11 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत या पक्षाच्या जागा वाढतील, असं हे अंदाज सांगतात.
चंद्रशेखर राव हे देशाच्या राजकारणात आणि सरकारस्थापनेत महत्त्वाचा वाटा उचलतील, अशी चर्चा होती. त्यासाठी चंद्रशेखर राव यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याच्याही बातम्या होत्या.
TRS ची ताकद वाढली
तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर इथे झालेली ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. तेलंगणामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये TRSची ताकद वाढताना दिसत आहे. 1999मध्ये तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी टीडीपीच्या तिकिटावर विजय मिळवला होता. पण, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं नव्हतं. के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभेचं उपसभापतीपद चंद्रबाबू नायडू यांनी दिलं होतं. त्यानंतर एका वर्षानंतर के. चंद्रशेखर राव यांनी टीडीपीशी फारकत घेत तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना केली.
2004मध्ये TRSला पाच जागांवरती विजय मिळाला होता. त्यानंतर त्यांना UPAमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. 2009मध्ये निकालांच्या पूर्वी त्यांनी NDAचा हात धरला. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. कारण, TRSला केवळ 2 जागी विजय मिळाला. तेलंगणामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना अगदी कमी जागा मिळतील, असा अंदाज आहे.
===============================================================================
VIDEO : मोदींच्या केदारनाथ दौऱ्याविरोधात तक्रार, या आणि इतर टाॅप 18 बातम्या