Home /News /national /

एकनाथ शिंदे नेमके गेले कुठे? एका तासापासून हॉटेलमधून गायब

एकनाथ शिंदे नेमके गेले कुठे? एका तासापासून हॉटेलमधून गायब

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुंबई किंवा दिल्लीला गेले का? असा सवालही आता उपस्थित होत आहे. आतापर्यंत हॉटेलमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक आमदाराच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे स्वतः हजर राहायचे. मात्र, नुकतंच दिलीप लांडे यांनी हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे इथे उपस्थित नव्हते.

पुढे वाचा ...
    गुवाहाटी 24 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काही वेळापूर्वी पोलीस बंदोबस्तात दोन-तीन आमदारांसोबत हॉटेल रेडिसनमधून बाहेर पडले होते. मात्र, आता एक तास उलटूनही एकनाथ शिंदे हॉटेलमध्ये परतलेले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. न्यूज १८ प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस बंदोबस्तात एकनाथ शिंदे हॉटेलमधून बाहेर पडले होते. मात्र अद्याप ते परतलेले नाहीत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सकाळपासून राजकीय नेत्यांच्या संपर्कात होते. सुरुवातीला असं सांगितलं गेली की गुवाहाटीमध्येच काहीतरी कामासाठी गेले आहेत. NCP Narhari Zirwal : राज्याच्या राजकारणाला नवे वळण विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळच नॉट रिचेबल एकनाथ शिंदे मुंबई किंवा दिल्लीला गेले का? असा सवालही आता उपस्थित होत आहे. आतापर्यंत हॉटेलमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक आमदाराच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे स्वतः हजर राहायचे. मात्र, नुकतंच दिलीप लांडे यांनी हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे इथे उपस्थित नव्हते. नवं सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, शिंदे गटाची कोर्टात धाव आसाम पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे गुवाहाटीमधील एका मंदिरामध्ये गेलेले आहेत. याबद्दल त्यांनी अधिक माहिती दिलेली नाही.  दरम्यान सध्या सुरू असलेल्या वेळकाढूपणाला छेद देण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्यामागे दोन तृतीयांश शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. या गटाच्या मान्यतेसाठी त्यांनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या