मुंबई, 24 जून : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला निर्णायक वळण लागलं आहे. महाविकास आघाडी सरकार हटवून नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलाय. सध्या सुरू असलेल्या वेळकाढूपणाला छेद देण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्यामागे दोन तृतीयांश शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. या गटाच्या मान्यतेसाठी त्यांनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.
महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शिंदे समर्थक आमदारांना अपात्र करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेने या आमदारांविरोधात कारवाईचा प्रयत्न सुरू केला आहे. व्हिपनंतरही बैठकीला उपस्थित न राहिलेल्या आमदारांना अपात्र ठरवणार असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. आत्तापर्यंत एकूण 17 शिवसेना आमदारांना अपात्र करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानसभेच्या उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पवारांनी खास सूचना केल्या आहेत. त्यानुसार थेट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आऊट करण्याचा पवारांचा प्लॅन आहे.शिवसेनेतीस शिंदे समर्थक आमदार हे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. पण, त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मुंबईमध्ये विधानसभेत यावे लागेल. त्यावेळी शिंदे यांना रोखण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्लॅन आहे.
महाविकास आघाडी सरकारचा हा प्लॅन उधळून लावण्यासाठी शिंदे गटानं आता मुंबई हायकोर्टात धाव घेतलीय. त्यामुळे या प्रकरणात आता पुढील घडामोडींचं केंद्र विधानभवानाप्रमाणेच मुंबई हायकोर्ट हे देखील राहणार आहे. शिंदे गटानं यापूर्वीच शिवसेनेच्या मागणीनंतरही समर्थक आमदार अपात्र होणार नाहीत, असा दावा केला आहे. हाच दावा या गटाकडून हायकोर्टात मांडला जाईल.
नवं सरकार किंवा पुन्हा निवडणूक? राज्यातील सत्तासंघर्षात आता फक्त 2 पर्याय शिल्लक
आमच्याकडे 40 शिवसेना आमदार आणि 12 अपक्ष आमदार आहेत. अशात अल्पमतात असताना गटनेता बदलता येत नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आमदारांना अपत्रा ठरवण्याबाबतच्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की बैठकीला हजर नाही म्हणून एखाद्याला अपात्र ठरवणं हे हस्यास्पद आणि बेकायदेशीर आहे. याचा कोणताही परिणाम आमदारांवर होणार नाही, असा शिंदे गटाचा दावा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Mumbai high court, Shivsena