नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्पसह 24 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. अहमदाबादसह ज्या ज्या ठिकाणी ते भेट देणार आहेत, त्याठिकाणची सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांची झोपच ट्रम्प दौऱ्यामुळे उडाली आहे. ट्रम्प आग्रा येथील ताजमहालला देखील भेट देणार आहेत. तर याठिकाणी जरी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असली तरी मुख्य समस्या आहे माकडांची. गेल्या काही दिवसांपासून माकडांचा उच्छाद वाढला आहे. सुरक्षा रक्षकांना देखील ताजमहालजवळ असणाऱ्या माकडांना आवरणं कठिण होऊन जात आहे. ट्रम्प यांच्या सुरक्षिततेसाठी मोठा फौजफाटा असला तरी ही माकडं सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देऊन पळून जातात. अशावेळी या माकडांना आवरण्यासाठी चक्क 5 वानर म्हणजेच मोठ्या शेपटींची माकडं तैनात करण्यात आली आहेत. ही माकडं प्रशिक्षित असणार आहे. 24 तारीखला जेव्हा डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प ताजमहालला भेट देतील तेव्हा ही माकडं सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. प्रशिक्षित माकडांमुळे उच्छाद घालणाऱ्या माकडांना आवरणं सोपं जाईल, अशी सुरक्षा यंत्रणांना अपेक्षा आहे. (हेही वाचा- जेव्हा प्रभासच्या जागी बाहुबलीत दिसले ट्रम्प, भारत दौऱ्याआधी VIDEO VIRAL) सूत्रांच्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी अमेरिकन सिक्रेट सर्व्हिस, पॅरामिलिटरी फोर्सेसच्या 10 कंपन्या, 10 PAC कंपन्या आणि बाह्य सुरक्षेसाठी NSG कमांडो तैनात करण्यात आले आहेत. ट्रम्प यांचा भारत दौरा येणाऱ्या काही दिवसांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम असणार आहे. अशावेळी केवळ माकडांमुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेचे तीन-तेरा वाजले तरी सुरक्षा यंत्रणांची नाचक्की होईल. त्यामुळे या प्रशिक्षित माकडांना तैनात करण्यात आलं आहे. अन्य बातम्या ट्रम्प उतरणारं दिल्लीतील हॉटेल पाहाल तर थक्क व्हाल, एका रात्रीचं भाडं तब्बल… 52 वर्षांचे डोनाल्ड ट्रम्प पडले होते 28 वर्षीय मॉडेलच्या प्रेमात ट्रम्प यांच्या दौऱ्याची अशीही चर्चा, 15 किमीपर्यंत चालणार नाही मोबाईल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







