52 वर्षांचे डोनाल्ड ट्रम्प पडले होते 28 वर्षीय मॉडेलच्या प्रेमात, याआधी झाली होती 2 लग्न

मुंबई, 20 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 2 दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. 24 फेब्रुवारीला ते अहमदाबादमध्ये पोहोचणार आहेत आणि यावेळी त्यांच्यासोबत त्यांची तिसरी पत्नी मेलेनिया ट्रम्प या सुद्धा असणार आहेत. याच पार्श्वभूमिवर जाणून घेऊयात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि फर्स्ट लेडी यांची लव्हस्टोरी...

  • Share this:

डोनाल्ड ट्रम्प यांची लव्ह स्टोरी 1998मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प 52 वर्षाचे होते तर मेलेनिया 28 वर्षांच्या होत्या. त्यावेळी ट्रप्प राजकारणात नसून रिअल-इस्टेटमध्ये सक्रिय होते.

न्यूयॉर्क सीटी फॅशन वीक चालू होता आणि त्यावेळी सुरू असलेल्य़ा एका पार्टीदरम्यान ट्रम्प आणि मेलेनिया यांच्यामध्ये नजरानजर झाली. त्यावेळी ट्रम्प यांचा त्यांची दुसरी पत्नी मेपलबरोबर घटस्फोट होणार होता

न्यूयॉर्क सीटी फॅशन वीक चालू होता आणि त्यावेळी सुरू असलेल्य़ा एका पार्टीदरम्यान ट्रम्प आणि मेलेनिया यांच्यामध्ये नजरानजर झाली. त्यावेळी ट्रम्प यांचा त्यांची दुसरी पत्नी मेपलबरोबर घटस्फोट होणार होता.

याच पार्टीदरम्यान दोघांनी आपला नंबर एक्सचेंज केला होता. आठवडाभरातच ट्रम्प यांनी मेलेनिया यांना फोन केला होता. त्यानंतर लगेचच त्यांनी डेट करायला सुरू केलं.

2000 मध्ये दोघांच्या नात्यामधील चर्चांना उधाण आलं होतं. 2000मध्ये ट्रम्प रिफॉर्म पार्टीचे उमेदवार होते. 2001मध्ये मेलेनिया यांना ग्रीन कार्ड मिळालं आणि त्या ट्रम्प टॉवरमध्ये आल्या.

5 वर्षाच्या रिलेशनशीपनंतर ट्रम्प आणि मेलेनिया यांनी 2005मध्ये लग्न केलं. 2004 सालात डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलेनिया यांना 1.5 मिलियन डॉलरची अंगठी देऊन लग्नासाठी मागणी घातली होती. ट्रम्प यांच्याकडून वेळोवेळी हेच सांगण्यात यायचं की त्यांच्या यशामध्ये मेलेनिया यांचा मोठा वाटा आहे.

2005मध्ये पाम बीचवर डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांचं लग्न पार पडलं. त्यावेळी मेलेनिया यांनी 1 लाख डॉलरचा ड्रेस परिधान केला होता. यावेळी हॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. लग्नामध्ये बिल गेट्स आणि हिलारी क्लिंटनदेखील उपस्थित होत्या

2005मध्ये पाम बीचवर डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांचं लग्न पार पडलं. त्यावेळी मेलेनिया यांनी 1 लाख डॉलरचा ड्रेस परिधान केला होता. यावेळी हॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. लग्नामध्ये बिल गेट्स आणि हिलारी क्लिंटनदेखील उपस्थित होते.

2006मध्ये जेव्हा मेलेनिया यांनी मुलगा बेरॉनला जन्म दिला त्यावेळी ट्रम्प 60 वर्षांचे होते. त्यावेळी ट्रम्प यांची मुलं इवांका आणि डोनाल्ड ज्युनिअर लहान होते. 12 वर्षांच्या इवांकाला आपण मैत्रिण मानत असल्याची प्रतिक्रिया त्यावेळी सावत्र आई मेलेनिया यांनी दिली होती.

2016 मध्ये ट्रम्प अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष बनले आणि त्यावेळी मेलेनिया यांना अमेरिकेची फर्स्ट लेडी होण्याचा मान मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2020 05:35 PM IST

ताज्या बातम्या