VIDEO : जेव्हा प्रभासच्या जागी बाहुबलीत दिसले ट्रम्प, भारत दौऱ्याआधी नवा लूक VIRAL

VIDEO : जेव्हा प्रभासच्या जागी बाहुबलीत दिसले ट्रम्प, भारत दौऱ्याआधी नवा लूक VIRAL

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (USA President, Donald Trump) 24 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत आहेत. त्याआधी त्यांच्या एका व्हिडिओची चर्चा होत आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 23 फेब्रुवारी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी उरला आहे. ट्रम्प भारतातील त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी ट्रम्प यांनी स्वत: एक मजेशीर व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये दक्षिण अभिनेता प्रभासच्या ‘बाहुबली’ चित्रपटाचे मिम तयार करण्यात आले आहे. यात ट्रम्प स्वत: बाहुबलीच्या भुमिकेत दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्यासोबत त्यांनी पत्नी मेलानिया, मुलगी इव्हांका आणि जावई कुशनर हेदेखील दर्शविले आहेत. यापूर्वी ट्रम्प यांनी ट्विटरवर 'शुभ मंगल ज्यादा सावधान और सदन' या बॉलिवूड चित्रपटाचे कौतुकही केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (USA President, Donald Trump) 24 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत आहेत. ट्रम्प हे आपल्या परिवारासह भारतात येत आहेत. त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. गुजरातमधील अहमदाबादपासून ते आग्र्यापर्यंतचा त्यांचा दौरा खास बनवण्यासाठी तयारीमध्ये कोणतीच कमतरता राहू नये याची खबरदारी घेतली जातेय.

वाचा-ट्रम्प उतरणारं दिल्लीतील हॉटेल पाहाल तर थक्क व्हाल, एका रात्रीचं भाडं तब्बल...

ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांच्याबरोबर असणार्‍या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळात त्यांची मुलगी इव्हांका, जावई जारेड कुशनर आणि उच्च अमेरिकी अधिकारी यांचे पथक असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यावेळी त्यांच्यासोबत पत्नी मेलानिया ट्रम्प देखील असणार आहे. याच बरोबर शिष्टमंडळातील इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये अर्थमंत्री स्टीव्हन मुनुचिन, वाणिज्यमंत्री बिल्बर रॉस, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन आणि ऊर्जामंत्री डॅन ब्रुलीएटे यांचा समावेश आहे.

वाचा-डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्रसिद्ध बुखारा रेस्टॉरंटमध्ये असेल हा 'खास मेन्यू'

वाचा-'मोदी सरकार करणार 69 लाख जागांची नोकरभरती', ट्रम्प दौऱ्यावरून काँग्रेसची टीका

ट्रम्प यांच्या या दौऱ्यात संरक्षण आणि व्यापारासह विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 25 फेब्रुवारी रोजी संरक्षण आणि व्यापारासह विविध क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. त्याचबरोबर अहमदाबादमधील नमस्ते ट्रम्पचा कार्यक्रम हाउस्टनमध्ये झालेल्या हॉडी मोदी कार्यक्रमासारखा असेल. मोदी ट्रम्पसाठी दुपारचे जेवण आयोजित करतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ट्रम्प यांच्यासोबत जेवण करतील.

वाचा-‘ Great! ’, आयुष्मानच्या शुभ मंगल ज्यादा सावधाननं डोनाल्ड ट्रम्पनाही लावलं याड

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीत भारत आणि अमेरिकेतील व्यापार कराराला प्रोत्साहन दिले जाऊ शकते. दोन्ही देश दीर्घकालीन दृष्टीकोनातून हा निर्णय घेतील. एवढेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यात काही संरक्षण करारही होऊ शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Trump 2020
First Published: Feb 23, 2020 08:55 AM IST

ताज्या बातम्या