आग्रा, 20 फेब्रुवारी - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) लवकरच भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ट्रम्प ताज महालला (tajmahal) भेट देणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दौऱ्यात सुरक्षेच्या बाबतीत मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. त्यांच्या या संपूर्ण दौऱ्यात पोलीस कडक व्यवस्था तैनात करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तब्बल 6000पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. त्यासोबतच विमानतळापासून ते ताजमहालपासून पाच विभाग बनवले जातील. ट्रम्प यांच्या आगमनाबरोबर मोबाईल जॅमर लाऊन विमानतळापासून ते ताजगंज भागापर्यंत संपूर्ण मोबाईल बंद केले जातील. या संपूर्ण भागात म्हणजे जवळपास 15 किमी अंतरावरील संपूर्ण मोबाईल नेटवर्क बंद करण्यात येणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा आग्रा दौरा झाल्यानंतर त्यांनी ताजमहालला भेट देऊन ते तिथून निघाल्यानंतर मोबाईलचे सर्व सिग्नल सुरू केले जातील. ट्रम्प यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जवळपास 108 संवेदनसील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांचा 36 तास मुक्काम, मोदींसोबत लंच तर या मुद्द्यांवर होणार चर्चा याशिवाय 15 उंच घरांच्या छप्परांवर पहारा करत पोलीस निरिक्षण करणार आहेत. विमानतळापासून ते ताजमहालपर्यंत जवळपास 150 छोटेमोठे रस्ते आहेत. तर 19 चौक आहेत. या सगळ्या ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे 10 ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलीस या सगळ्यावर नजर ठेवणार आहेत. घराघरातून पोलीस घेत आहेत माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प च्या 24 फेब्रुवारीला होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस विमानतळ आणि आसपासच्या परिसराती प्रत्येक घरांमध्ये जाऊन माहिती घेत आहेत. हॉटेलमध्ये थांबलेल्या लोकांचीही माहिती घेतली जात आहे. परिसरात राहणाऱ्या भाडेकरूंचीही पूर्ण माहिती पोलिसांकडून जमा केली जात आहे. जगातील सर्वात बलवान राष्ट्राध्यक्षाच्या दौऱ्याच्या सुरक्षेला घेऊन खबरदारी घेण्यासाठी पोलिसांच्या अनेक टीम कामाला लागल्या आहेत. एकीकडे प्रसासन ट्रम्प यांच्या आगमनाच्या तयारीला लागलं असताना दुसरीकडे पोलिसांचं लक्ष मात्र सुरक्षेवर आहे. सुरक्षेच्या आढाव्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना अनेक बैठकाही पार पडल्या आहेत. एक दिवस आधीच रस्ता मोकळा होणार - ताजनगरी आग्रामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं आगमन होण्याच्या एक दिवस आधी संपूर्ण ताफ्याचा अभ्यास केला जाणार आहे. तापा जाऊन परत येण्यापर्यंतचा खेरिया विमानतळापर्यंत 15 किमी रस्त्यावर वाहनांना थांबवण्यात येणार आहे. अन्य बातम्या VIDEO ‘15 कोटी आहोत पण 100 कोटींवर भारी आहोत’, वारिस पठाण यांची चिथावणी प्रियंका गांधींच्या लग्नाचा 23वा वाढदिवस, शेअर केले खासगी PHOTOS
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








