नकुल जसुजा, प्रतिनिधी सिरसा, 14 जून : लहानपणापासून जपलेली कला मोठेपणी कामात बदलून प्रतिष्ठा मिळवणारे, उत्तम कमाई करणारे फार कमी लोक असतात. मात्र त्यांच्यात जिद्द आणि आत्मविश्वास प्रचंड असतो. तर काही लोक असेही असतात जे आपल्या व्यवसायासह आपली कलाही उत्तमरीत्या जपतात. आज अशाच एका पिता-पुत्राची गोष्ट आपण पाहणार आहोत जे इतरांसाठी एक उदाहरण ठरले आहेत. हरियाणाच्या सिरसा भागात राहणारे हे पिता-पुत्र पेशाने डॉक्टर आहेत. मात्र पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती करून उत्पन्न कसं वाढवायचं हे त्यांच्यातल्या शेतकऱ्याने दाखवून दिलं आहे.
डॉ. गुलाबसिंह सिहाग हे सरकारी रुग्णालयातून निवृत्त झाले आहेत. आता ते सिरसा येथील एका खासगी रुग्णालयात सेवा देतात. तर, त्यांचा मुलगा अभिषेक सिहाग हे दिल्लीत दंतवैद्य म्हणून कार्यरत आहेत. मुख्य म्हणजे डॉ. गुलाबसिंह सिहाग हे गेली 12 वर्षे सातत्याने आधुनिक शेती करतात. सिरसापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या भावदीन गावात त्यांचं स्वतःचं शेत आहे. आपल्या शेतात त्यांनी आंबा, लिंबू, अंजीर, डाळिंब, द्राक्ष, पेरू, इत्यादींसह विविध फळांची लागवड केली आहे. डॉक्टर पिता-पुत्राची ही जोडी आठवड्याचे 5 दिवस रुग्णांची सेवा करते आणि उरलेले 2 दिवस शेतीत लक्ष देते. त्यामुळे शेतीतून त्यांना हवा तसा नफाही मिळतो. शेतीसाठी हरियाणा सरकारकडून विविध प्रकारचं अनुदान मिळतं. अनुदान मिळाल्याने शेती करणं सोपं होतं, असं डॉ. गुलाबसिंह आणि डॉ. अभिषेक यांनी सांगितलं. विशेष म्हणजे मार्च, 2023 मध्ये त्यांना मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्याकडून प्रगतशील शेतकरी पुरस्कारही मिळाला. जिल्हा फलोत्पादन अधिकाऱ्यांनीही त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं. Ankita Lokhande : कष्टानं घेतलं घर; झालं एक वर्ष पूर्ण, पुजेसाठी अंकिता लोखंडेनं बोलावले निर्वस्त्र दिगंबर साधु सिहाग यांनी 2011 साली पारंपरिक शेती सोडून फळं आणि भाजीपाल्याची लागवड करण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की, पूर्वी ते पारंपरिक शेती करायचे. पारंपरिक शेतीत पाण्याचा प्रचंड वापर व्हायचा, परंतु अपेक्षेप्रमाणे पीक यायचं नाही. त्यातुलनेत भाजी आणि फळांच्या लागवडीसाठी पाण्याची आवश्यक कमी असते. तसंच पिकांचं नुकसान होण्याची शक्यताही कमी असते. त्याचबरोबर गांडुळ खतांच्या वापरामुळे उत्पादनही जास्त मिळतं आणि विषारी कीटकनाशकांपासून पिकांचं होणारं नुकसान टाळता येतं. दरम्यान, डॉ. गुलाबसिंह सिहाग आणि डॉ. अभिषेक सिहाग यांनी प्रगत आधुनिक शेती करून इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे.