जाहिरात
मराठी बातम्या / देश / भारतात त्यावेळी 10 हजाराच्याही नोटा छापल्या जायच्या; सर्वात उच्च मूल्याच्या नोटांचा असा आहे इतिहास

भारतात त्यावेळी 10 हजाराच्याही नोटा छापल्या जायच्या; सर्वात उच्च मूल्याच्या नोटांचा असा आहे इतिहास

भारतात त्यावेळी 10 हजाराच्याही नोटा छापल्या जायच्या; सर्वात उच्च मूल्याच्या नोटांचा असा आहे इतिहास

नोटाबंदीनंतर ज्याप्रमाणे पाचशे आणि एक हजाराच्या नोटा निरुपयोगी झाल्या, त्याचप्रमाणे भारतात अशा अनेक चलनी नोटा होत्या, ज्यांची छपाई पुढे बंद करण्यात आली. आज भारतात पाच, दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे, पाचशे आणि दोन हजाराच्या नोटा वापरल्या जातात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 मे : चलनाचा वापर जगभरातील वस्तू खरेदी करण्यासाठी केला जातो. जेव्हा चलन वापरले जात नव्हते, तेव्हा वस्तू खरेदी करण्यासाठी वस्तूंचाच वापर केला जात होता. याला वस्तुविनिमय प्रणाली असे म्हणतात. काही कालावधीनंतर मौल्यवान दगडांद्नारे वस्तू खरेदी केल्या गेल्या. सुरुवातीला सोने आणि चांदी वापरली गेली, जी नंतर नाण्यांमध्ये रुपांतरित झाली. त्यानंतर बघता-बघता कागदी नोटा अस्तित्वात आल्या. वेगवेगळ्या मूल्यांच्या नोटा चलनात येऊ लागल्या. वस्तूंच्या किमतीनुसार नोटा वापरल्या जात होत्या. भारतात 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीनंतर देशात पाचशे आणि एक हजाराच्या नोटांवर बंदी घालण्यात आली. काही काळानंतर हे चलन रद्दी कागद झाले. या नोटाबंदीनंतर ज्याप्रमाणे पाचशे आणि एक हजाराच्या नोटा निरुपयोगी झाल्या, त्याचप्रमाणे भारतात अशा अनेक चलनी नोटा होत्या, ज्यांची छपाई पुढे बंद करण्यात आली. आज भारतात पाच, दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे, पाचशे आणि दोन हजाराच्या नोटा वापरल्या जातात. पण अनेक वर्षांपूर्वी भारतात दहा हजाराच्या नोटाही छापल्या जात होत्या. असा आहे नोटांचा इतिहास - रिझर्व्ह बँकेने जानेवारी 1938 मध्ये भारतात पहिले कागदी चलन छापले होते. त्या पाच रुपयांच्या नोटा होत्या. त्याच वर्षी पहिल्यांदाच दहा हजारांच्या नोटाही छापण्यात आल्या. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने दहा, शंभर, हजाराच्याही नोटा छापल्या. मात्र, 1946 मध्ये दहा हजार आणि एक हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली. 1954 मध्ये पुन्हा एकदा नवीन डिझाइनसह छपाई सुरू झाली होती. . highest currency in india पाच हजारांच्या नोटाही छापण्यात आल्या - हे वाचा -  Relationship Tips: ‘या’ 4 सवयींच्या पुरूषांकडे अधिक आकर्षित होतात महिला ब्रिटिश राजवट संपल्यानंतर पुन्हा एकदा दहा हजाराच्या नोटा छापण्यात आल्या. त्यावेळी पाच हजारांच्या नोटाही छापल्या जात होत्या. अशा उच्च मूल्याच्या नोटांमुळे भ्रष्टाचार झपाट्याने वाढू लागला. पैशाचे काळ्या पैशात रूपांतर होऊ लागले. यामुळे अखेर 1978 मध्ये पंतप्रधान मोराजी देसाई यांनी दहा आणि पाच हजाराच्या नोटांवर पूर्णपणे बंदी घातली. आजच्या काळात सर्वाधिक मूल्य असलेली नोट ही दोन हजारांची आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात