Home /News /lifestyle /

Relationship Tips: 'या' 4 सवयींच्या पुरूषांकडे अधिक आकर्षित होतात महिला

Relationship Tips: 'या' 4 सवयींच्या पुरूषांकडे अधिक आकर्षित होतात महिला

Relationship Tips: पुरुषांच्या काही गोष्टी महिलांना सगळ्यांत जास्त आकर्षित करतात. त्यापैकी 4 महत्त्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

    मुंबई, 19 मे :  महिला पुरुषांकडे कोणत्या कारणांमुळे आकर्षित होतात (Why Women Attracts towards Men) याबद्दल अनेकदा चर्चा होत असते. पुरुषांच्या कोणत्या गोष्टी किंवा वागणं महिलांना आकर्षित करतं हे एक गूढ आहे, असं म्हणतात.  पुरुषांच्या काही गोष्टी महिलांना सगळ्यांत जास्त आकर्षित करतात. त्या कोणत्या आहेत याबद्दल 'नवभारत टाईम्सम'ध्ये अधिक माहिती देण्यात आली आहे. अनेकदा आपण अशा काही गोष्टी करतो ज्या आपल्या लक्षातही येत नाहीत, पण इतरांना मात्र त्या खूप आकर्षित करतात. पुरुषांच्या काही सवयी महिलांना खूप आकर्षित करतात. त्यांच्या वागण्याबोलण्यातल्या या 4 गोष्टी बघितलं तर  छोट्या वाटतात पण त्यामुळे पुरुषांचं व्यक्तिमत्व आकर्षक बनतं. इंप्रेस न करण्याचा प्रयत्न (No Efforts To Impress) महिलांना आकर्षित करण्यासाठी अनेक पुरुष खूप प्रयत्न करताना दिसतात; पण काहीजण मात्र अजिबात असे प्रयत्न करत नाहीत. हीच गोष्ट महिलांना अत्यंत आकर्षित करते. जे पुरुष सुरुवातीला अजिबात लक्ष देत नाहीत किंवा अगदी कमी लक्ष देतात त्यांच्याकडे महिला जास्त आकर्षित होतात, असं रिसर्चमधूनही स्पष्ट झालं आहे. हे ऐकायला विचित्र वाटेल. पुरुष महिलांकडे जितकं कमी लक्ष देतील किंवा त्यांना इंप्रेस करण्याचा जितका कमी प्रयत्न करतील तितकं महिलांचं लक्ष वेधून घेण्यात ते यशस्वी होतात असं म्हटलं जातं. अशी सवय असलेल्या पुरुषांकडे महिला लवकर आकर्षित होतात. ड्रेसिंग स्टाईल(Dressing Style Of Men) पुरुषांच्या ड्रेसिंग स्टाईलकडे महिलांचं लक्ष पटकन वेधलं जातं. फॉर्मल कपड्यांमध्ये असलेल्या पुरुषांकडे बघून त्यांचं गांभीर्य, ताकद आणि त्याच्या अधिकाराबद्दल अगदी लगेचच समजतं. नेहमी कॅज्युअल कपडे घालायला ज्या पुरुषांना आवडतं त्यांचा स्वभाव गंमतीशीर असतो असं समजलं जातं. त्यामुळे पुरुषांच्या ड्रेसिंग स्टाईलचाही महिलांवर खूप मोठा परिणाम होतो. ऐकावं ते नवल! ज्या बाळाला जन्म दिला त्याच बाळामुळे पुन्हा प्रेग्नंट झाली महिला भेदक नजर (Intense Eye Contact) पार्टनरकडे भेदक नजरेनं बघणाऱ्या पुरुषांच्या भावना त्यांच्या डोळ्यांतून स्पष्ट दिसतात. हे पुरुष अत्यंत आकर्षक दिसतात असं महिलांना वाटतं.  अशा प्रकारचा इंटेन्स आय कॉन्टॅक्ट म्हणजे नजर अत्यंत आकर्षक असते. दोन व्यक्तींची नजर  एकमेकांना भिडते तेव्हा प्रेम वाढतं असं शास्त्रज्ञांचंही म्हणणं आहे. त्यामुळे असे लूक्स देणाऱ्या पुरुषांकडे महिला लवकर आकर्षित होतात यात नवल नाही. प्रेमात पडल्यावर कशी बदलते व्यक्ती; हा एक PHOTO उलगडेल गुपित सेन्स ऑफ ह्युमर (Sense Of Humour) गंमतीशीर स्वभाव किंवा जोक्स सांगणारे पुरुष महिलांना आवडतात. त्यांच्या मस्त मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांचं कूल व्यक्तिमत्व समोर येतं. अशा पुरुषांच्या सान्निध्यात महिला स्वत:ला सुरक्षित समजतात. महिलांना ज्या व्यक्ती हसवतात त्यांच्यावर महिला जास्त प्रेम करतात असं रिसर्चमधून स्पष्ट झालं आहे. या अगदी छोट्या गोष्टी आहेत; पण यामुळेच तरुण मुली किंवा महिला पुरुषांकडे आकर्षित होतात. यातूनच कदाचित काहीजणांची आयुष्यभराची नातीही जोडली जातात.
    First published:

    Tags: Relationship tips, Women

    पुढील बातम्या