एवढंच नव्हे तर नेटकऱ्यांनी देखील सचिनला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. केरळमधील काही सोशल मीडिया युजर्सनी तर थेट टेनिसस्टार मारिया शारापोव्हाची याप्रकरणी माफी मागितली आहे. सचिन तेंडुलकरला आम्ही ओळखू शकलो नाही. आम्हाला माफ कर. तू बरोबर होतीस.’ अशा आशयाचे मेसेज त्यांनी मारियाला पाठवले आहेत. मारियानं 2014 साली झालेल्या विम्बलडन स्पर्धेच्या दरम्यान आपण भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) ओळखत नाही, असं वक्तव्य केलं होतं. सचिनवर राग का? शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं अनेक विदेशी सेलिब्रेटींनी ट्वीट केल्यानंतर त्याला उत्तर देण्याची मोहीम भारतामध्ये सुरु झाली होती. याच मोहिमेअंतर्गत सचिननं बुधवारी ट्वीट केलं होतं. 'देशाच्या सार्वभौमत्वाशी कधीही तडजोड केली जाणार नाही. बाहेरच्या शक्तींनी याकडे दुरूनच पाहावं, अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करु नये. भारतीयांना आमचा भारत चांगला माहिती आहे आणि आम्ही आमच्या देशाचं भलं जाणतो. चला देश म्हणून एकत्र येऊ या',केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले, भारतरत्न आणि मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडूलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का ?@sachin_rt https://t.co/oEh9t4LzXp
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 5, 2021
सचिननं हे ट्वीट करताच भारतीय क्रिकेट विश्वातील अनेक माजी क्रिकेटपटूंनी या विषयावर ट्वीट करत विदेशी मंडळींना सुनावलं आहे. त्याचवेळी सचिनच्या ट्विटमुळे काही जण दुखावले देखील आहेत. याच दुखावलेल्या मंडळीनी शारापोव्हाला संदेश पाठवून माफी मागितली आहे.India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants. Indians know India and should decide for India. Let's remain united as a nation.#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 3, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Kerala, Sachin tendulkar