मराठी बातम्या /बातम्या /देश /

धक्कादायक खुलासा, आयबी कॉन्स्टेबल अंकित शर्मांच्या शरीरावर चाकूचे 18 वार

धक्कादायक खुलासा, आयबी कॉन्स्टेबल अंकित शर्मांच्या शरीरावर चाकूचे 18 वार

आयबी कॉन्स्टेबल अंकित शर्मा यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय आला आहे? वाचा सविस्तर

आयबी कॉन्स्टेबल अंकित शर्मा यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय आला आहे? वाचा सविस्तर

आयबी कॉन्स्टेबल अंकित शर्मा यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय आला आहे? वाचा सविस्तर

  • Published by:  Akshay Shitole

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात दंगेखोरांनी आयबी कॉन्स्टेबलची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला होता. त्याचा शविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या अहवालात आयबी कॉन्स्टेबल अंकित शर्मा यांच्या शरीरावर धारदार शस्त्राचे निशाण असल्याचं सांगण्यात आलं आहे. संपूर्ण शरीरावर चाकूचे अनेक निशाण होते. पोटावर आणि मानेवरील घाव अधिक खोल असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते ताहिर हुसैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी ताहिर हुसैन यांची आप पक्षातू हकालपट्टीही करण्यात आली आहे. हुसैन यांच्यावर शर्मा यांची हत्या केल्याचा आणि हिंसा भडकवल्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहवालातून अंकित यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या अंगावर जवळपास 18 वेळा करण्यात आलेले धारदार शस्त्राचे वार पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.

अंकित शर्मा यांच्या कुटुंबियांची काय आहे प्रतिक्रिया

आपचे नेते हुसैन यांनीच हत्या केल्याचा गंभीर आरोप शर्मा यांच्या कुटुंबियांनी केला आहे. शेजारच्यांनी मदतीसाठी आवज दिला असता अंकित मदतीसाठी निघाले. त्यावेळी कुटुंबियांना त्यांना घराबाहेर जाण्यासाठी विरोध केला मात्र मदतीची गरज आहे असं सांगून अंकित बाहेर पडले ते पुन्हा घरी आलेच नाहीत असं कुटुंबियांचं म्हणणं आहे.

हेही वाचा-वृद्ध आई-वडिलांची हत्या करून पळून चालला होता मुलगा, अपघातात झाला चेंदामेंदा!

रविंदर शर्मा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अंकित हे 2017 मध्ये आयबीमध्ये भरती झाले होते. त्यांचा अद्याप विवाहदेखील झाला नव्हता. त्यांच्या हत्येनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, ईशान्य दिल्लीत गेल्या चार दिवसात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) हिंसाचारात आतापर्यंत 48 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 56 पोलिसांसह 200 जण जखमी असल्याची माहिती आहे. विविध रुग्णालयांशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. गेल्या दोन दिवसांत 120 हून अधिक लोकांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा-दिल्ली हिंसाचार : आप नगरसेवकाच्या घरात सापडले पेट्रोल बॉम्ब आणि दगडांचा खच

First published:

Tags: Amit Shah, Caa, PM narendra modi