मराठी बातम्या /बातम्या /देश /

वृद्ध आई-वडिलांची हत्या करून पळून चालला होता मुलगा, अपघातात झाला चेंदामेंदा!

वृद्ध आई-वडिलांची हत्या करून पळून चालला होता मुलगा, अपघातात झाला चेंदामेंदा!

जन्मदात्या आई-वडिलांचा ज्या वयात आधार होऊन सेवा करायची असते त्याच वयात मुलाने त्यांची हत्या केली

जन्मदात्या आई-वडिलांचा ज्या वयात आधार होऊन सेवा करायची असते त्याच वयात मुलाने त्यांची हत्या केली

जन्मदात्या आई-वडिलांचा ज्या वयात आधार होऊन सेवा करायची असते त्याच वयात मुलाने त्यांची हत्या केली

  • Published by:  sachin Salve

नागौर, 27 फेब्रुवारी : जन्मदात्या आई-वडिलांचा ज्या वयात आधार होऊन सेवा करायची असते त्याच वयात मुलाने त्यांचं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याहुन भीषण म्हणजे, आई-वडिलांची कुऱ्हाडीने हत्या करून पळून जात असताना या मुलाचाही अपघातात मृत्यू झाला.

राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील 26 फेब्रुवारी रोजी बुधवारी भदाणा गावात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भदाणा गावाजवळील डेगाना महामार्गावर एका दुचाकी स्वाराचा अपघात झाला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली.  घटनास्थळी पोहोचण्याच्या आधीच जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला होता. गावातील लोकांनी ही मृत व्यक्ती भदाणा गावातील हनुमानराम (वय 40) असल्याचं सांगितलं. एका अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे हनुमानराम गंभीर जखमी झाला होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

त्याच दरम्यान पोलिसांना आणखी एक माहिती मिळाली की, हनुमानरामने आपल्या जन्मदात्या आई वडिलांची हत्या केली. वडील रुघाराम (82) आणि पतासीदेवी (80) यांची त्याने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली होती. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन पाहणी केली असता आई आणि वडिलांच्या मृतदेहावर कुऱ्हाडीचे घाव आढळून आले. हनुमान रामाने आपले  आई-वडिल गाढ झोपेत असताना डोक्यात आणि मानेवर कुऱ्हाडीने वार केले होते. यातच त्यांचा मृत्यू झाला. ही सगळी हकीकत  हनुमानरामच्या पत्नीने पोलिसांना सांगितली.

आई-वडिलांची हत्या करून तो दुचाकीवरून पळून गेला होता.  त्याच्या पत्नीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला होता पण तो तिला न जुमनात पुढे निघून गेला. पत्नीने गावातील लोकांना बोलावून घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली त्यानंतर पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली.

भदाणा गावात वृद्ध आई-वडिलांची हत्या झाल्याची माहिती मिळाल्यानंतर एसपी विकास पाठक, एएसपी रामकुमार कस्वां, डीएसपी मुकुल शर्मा सह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मृत आई-वडिलांचे मृतदेह हे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. मुलगा हनुमानरामने हे कृत्य का आणि कशासाठी केलं याचा पोलीस तपास करत आहे. जमिनीच्या वादातून त्याने ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

First published: