नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : उत्तर-पूर्व दिल्लीतील खजूरी येथे हिंसाचार भडवण्यामागे आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसैन यांचा हात होता? त्यांच्या घरातील काही छायाचित्रामुळे ते संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. ताहिर हुसैन यांच्या घरातून पेट्रोल बॉम्ब, बंदुका, मोठ मोठे दगड, बॅचकी जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या घराचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये या घरातून सतत दगडफेक व पेट्रोल बॉम्ब येत होते. गुप्तचर विभागाचे सहकारी अंकित शर्मा यांच्या हत्येसाठी या घराच्या छतावर असलेल्या लोकांना शर्मा यांच्या कुटुंबीयांनी जबाबदार ठरविले आहे. आम आदमी पार्टीचे नगरसेवक ताहिर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. यासाठी पार्टीदेखील ताहिर हुसैन यांच्या बचावासाठी समोर आली आहे. या प्रकरणात निष्पक्ष तपासाची मागणी करीत आहे.
Sanjay Singh, AAP: Tahir Hussain has already given his statement in which he said that he gave all details to police&media about mob entering his house during the violence. He had asked police for protection. Police came 8 hours late&rescued him&his family from his house. (2/2) https://t.co/AZns0p2AtW
— ANI (@ANI) February 27, 2020
आप नगरसेवकाच्या छतावर सापडले दगड आणि पेट्रोल बॉम्ब
गेल्या तीन दिवसांपासून दिल्ली धगधगतं होती. आज येथील परिस्थिती नियंत्रणाखाली आली आहे. जेव्हा काही माध्यमांचे प्रतिनिधी आप नगरसेवकाच्या घरावर गेले तेव्हा त्यांना छतावर दगडांचा ढीग दिसला. तिथे दगडांची खडीदेखील होती. जसं काही मोठ्या दगडांना तोडून त्याचे लहान लहान तुकडे करण्यात आले असावे. सोबतच तेथे एक मोठी बॅचकीदेखील पडलेली होती. याशिवाय शीतपेयांच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल भरलेले होते. ज्यावर कपडा लावून बॉम्ब बनविण्याचा प्रयत्न केला असावा अशी शक्यता वाटावी. याशिवाय अनेक गोण्यांमध्ये दगड भरलेले होते.
या प्रकरणात ताहिरने सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, हिंसाचारादरम्यान ते घरात नव्हते. त्यामुळे माझ्या घरावरुन कोण बॉम्ब फेकत होतं, याबद्दल मला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: AAP