मराठी बातम्या /बातम्या /देश /रात्री दुकान बंद करून झोपले, सकाळी 11 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांनी पाहिले

रात्री दुकान बंद करून झोपले, सकाळी 11 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांनी पाहिले

या मृत कुटुंबाचं किरकोळ किरानाचं दुकान आहे. रात्री 11:45 ला दुकान बंद करून ते त्यांच्या वरच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारी दुध घेण्यासाठी आले पण दुकान बंद होतं. त्यामुळे...

या मृत कुटुंबाचं किरकोळ किरानाचं दुकान आहे. रात्री 11:45 ला दुकान बंद करून ते त्यांच्या वरच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारी दुध घेण्यासाठी आले पण दुकान बंद होतं. त्यामुळे...

या मृत कुटुंबाचं किरकोळ किरानाचं दुकान आहे. रात्री 11:45 ला दुकान बंद करून ते त्यांच्या वरच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारी दुध घेण्यासाठी आले पण दुकान बंद होतं. त्यामुळे...

    नवी दिल्ली, 01 जुलै : दिल्लीच्या बुरोंडी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीत एकाच घरात 11 मृतदेह सापडले आहेत. यात 7 महिला आणि 4 पुरुषांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले. सगळ्यात गंभीर म्हणजे या सर्व मृतांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती.

    या 11 लोकांच्या कुटुंबात 2 भाऊ होते. या दोघांच्या पत्नी, दोघांची मुलं, एक आई आणि त्यांची बहिण असल्याची माहिती मिळत आहे. यात 10 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाले आणि त्यांच्या आईचा मृतदेह जमिनीवर पडलेल्या मिळाला. त्यांचा गळा दाबला गेला असल्याचंही सांगण्यात येत आहे.

    दिल्लीमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले 11 मृतदेह, सगळ्यांच्या डोळ्याला बांधली होती पट्टी

    या मृत कुटुंबाचं किरकोळ किरानाचं दुकान आहे. रात्री 11:45 ला दुकान बंद करून ते त्यांच्या वरच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारी दुध घेण्यासाठी आले पण दुकान बंद होतं. त्यामुळे आश्चर्यात पडलेल्या शेजारी त्यांच्या वरच्या खोलीत गेल्या तर खोलीचा दरवाजा उघडाच होता. त्या आत पाहण्यासाठी गेल्या तर हा सगळा प्रकार समोर आला.

    यानंतर तात्काळ पोलिसांना बोलवण्यात आलं आणि आता पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, या कुटुंबाने आत्महत्या केली आहे. पदरी पडलेलं दारिद्र्य असह्य झाल्याने या 11 जणांनी आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

    मध्य प्रदेशमध्ये 8 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार, आमदार-खासदारांचं मात्र राजकारण

    अशा अमानवी पद्धतीने या 11 जणांनी आत्महत्या केली त्यांची हत्या करण्यात आली याचा पोलीस तपास घेत आहे. अद्याप या प्रकरणात कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

    पण असे एकाच घरात 11 मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. या सगळ्या मृतदेहांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती आणि ते लटकवलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे पोलीस एका वेगळ्या दिशेने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

    हेही वाचा...

    पतीने जादूटोणा केल्याचं सांगून मांत्रिकाने 50 लाखांना लुटले!

    VIDEO:भाजप आमदारपुत्राची कारचालकाला भररस्त्यावर मारहाण

    धर्मा पाटील यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

     

    First published:
    top videos

      Tags: 11 dead body, Burundi, Crime, Delhi, Latest, Murder case, News