VIDEO:भाजप आमदारपुत्राची कारचालकाला भररस्त्यावर मारहाण

VIDEO:भाजप आमदारपुत्राची कारचालकाला भररस्त्यावर मारहाण

हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही राजाच्या मित्रांनी स्विफ्ट कारची तोडफोड सुद्धा केली.

  • Share this:

राजस्थान, 30 जून : राजकीय नेत्यांचे नातेवाईक कशा प्रकारे गुंडगिरी करतात हे आता नवीन राहिलं नाही. राजस्थानमध्ये भाजपच्या आमदाराच्या मुलाने कार ओव्हरटेक करू दिली नाही म्हणून एका कारचालकाला बेदम मारहाण करण्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

राजस्थानमधील बांसवाडाचे भाजपचे आमदार धनसिंह रावत यांचा मुलगा राजा याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. राजाने आपल्या स्काॅर्पियो कारला ओव्हरटेक करू दिलं नाही म्हणून भररस्त्यात कार ओव्हरटेक करून स्विफ्ट कारमधील तरुणाला बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही राजाच्या मित्रांनी स्विफ्ट कारची तोडफोड सुद्धा केली.

हेही वाचा

राष्ट्रवादी आक्रमक मग आपण का नाही?,काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांची नाराजी

धर्मा पाटील यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

आयकर विभागाने सुरू केली नवीन पॅनकार्ड सुविधा,ही कामं होतील मोफत

First published: June 30, 2018, 11:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading