मध्य प्रदेशमध्ये 8 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार, आमदार-खासदारांचं मात्र राजकारण

मध्य प्रदेशमधल्या मंदसोरमध्ये आठ वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करून अत्यंत निर्दयपणे बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2018 10:13 AM IST

मध्य प्रदेशमध्ये 8 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार, आमदार-खासदारांचं मात्र राजकारण

मध्य प्रदेश, 01 जुलै : मध्य प्रदेशमधल्या मंदसोरमध्ये आठ वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करून अत्यंत निर्दयपणे बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मंदसोर येथे मंगळवारी घरी जाण्यासाठी शाळेच्या बाहेर पालकांची वाट पाहत उभ्या असलेल्या चिमुकलीचे इरफान उर्फ भैय्यू याने अपहरण केलं त्यानंतर तो तिला बस स्थानकाजवळील झुडपांच्या मागे घेऊन गेला आणि त्यानं तिच्यावर बलात्कार केला.

दिल्लीमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले 11 मृतदेह, सगळ्यांच्या डोळ्याला बांधली होती पट्टी

स्थानिक बाजारपेठेत मजूर म्हणून काम करत असलेल्या इरफानला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेच्या विरोधात स्थानिकांनी काल आंदोलन केलं. तर दुसरीकडे या घटनेवर भाजपा आमदारानं हीन पातळीच राजकारण केलं आहे.

भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांच्याबरोबर आमदार सुदर्शन गुप्ताही पीडित चिमुकलीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी इंदुरच्या एमवाय रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयात पीडितेचं कुटुंबही उपस्थित होतं.

Loading...

खासदारांनी डॉक्टरांकडे मुलीच्या तब्येतीची चौकशी केल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्याच वेळी आमदार सुदर्शन हे पीडितेच्या कुटुंबीयांना म्हणाले, खासदारसाहेबांना धन्यवाद म्हणा. इतका धक्कादायक प्रकार घडलेला असताना आमदाराच्या अशा वक्तव्यानं स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होतोय.

दरम्यान पिडीतीच्या वडीलांचे म्हणणे आहे की आम्हाला कोणत्याच वादत पडायचे नाहीयं. मात्र आरोपीला फाशी द्यावी ही त्यांना मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पीडितेला न्याय मिळणार का हेच पाहणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचा...

पतीने जादूटोणा केल्याचं सांगून मांत्रिकाने 50 लाखांना लुटले!

VIDEO:भाजप आमदारपुत्राची कारचालकाला भररस्त्यावर मारहाण

धर्मा पाटील यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2018 10:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...