पतीने जादूटोणा केल्याचं सांगून मांत्रिकाने 50 लाखांना लुटले!

पतीने जादूटोणा केल्याचं सांगून मांत्रिकाने 50 लाखांना लुटले!

  • Share this:

मुंबई, 30 जून : अंधश्रद्धा, जादूटोणा कायदा अस्तित्वात आला पण अजूनही राज्यात अनेक ठिकाणी याला खतपाणी घालण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. चेंबूर टिळकनगर पोलिसांनी अंधश्रद्धा, जादूटोण्याच्या नावावर तब्बल 50 लाख रुपयांना लुटणाऱ्या विशाल पाटणे या मांत्रिकास अटक केली आहे. पाटणे याने दोन महिलांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत.

राज्यात अंधश्रद्धा कायदा अस्तित्वात येऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. पण अजूनही महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन पूर्ण पणे झाले नाही. मुंबई सारख्या शहरातही अंधश्रद्धेला बळी पडणारे आहेत. टिळकनगरमध्ये सुखविंदर सिंग यांची ओळख विशाल पाटणे याच्या सोबत झाली होती. सुखविंदर सिंग याचं त्यांच्या पतीसोबत भांडण होत होते म्हणून त्या त्यांच्यापासून वेगळी राहू लागल्या होत्या.

मांत्रिकच घरासमोर टाकायचा लिंबू-मिरची

याचा फायदा घेऊन सुखविंदर यांना त्यांचा पती केतन बुंदेला यांच्यापासून जीवाला धोका आहे त्याने तुमच्या परिवारावर जादूटोणा केला आहे असं सांगून त्यांचाकडून तसंच त्यांच्या इतर दोन बहिणींवर सुद्धा जादूटोणा केला आहे. त्यावरून एक गुरुजी आहेत ते हा जादूटोणा उतरवतात असे सांगून तोच त्यांच्या फ्लॅट समोर लिंबू,मिरची,बोकड,कोंबडी यांचे मुंडके तसंच हळद कुंकू काळ्या आणि लाल रंगाचे धागे आणून टाकत होता.

तिहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं, अंधश्रद्धेतून सहा वर्षाच्या चिमुरड्यासह तिघांची हत्या

50 लाख लुटले

तसंच आपल्या अंगात केतन आला असून तो तुम्हाला मारणार असं धमकावत असे या सर्व कामासाठी त्याने नगदी दीड लाख रुपये आणि चेकद्वारे तब्बल 42 लाख रुपये घेतले तसंच 7 लाख रुपये आणि दागिने सुध्दा घेतले.

टिळकनगर पोलिसांनी या भोंदू मांत्रिकाला अटक केली आहे. यात अजून सहभागी आरोपीना अटक करण्यासाठी त्याची चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकारी सुनील काळे यांनी सांगितले आहे.

नागपुरात कोळसा व्यापाऱ्यावर हल्ला करून लुटले 70 लाख रुपये

सुखविंदर या शिकलेल्या असून एका खासगी कंपनीत चांगल्या हुद्द्यावर कामाला आहेत. या भोंदू बाबाने सुखविंदर आणि त्यांच्या बहिणीचा जादूटोणाच्या नावावर संसार उद्ध्वस्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2018 06:55 PM IST

ताज्या बातम्या