मुंबई, 30 जून : मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी आल्याची घटना समोर आलीय. धर्मा पाटील प्रकरणात भुमी अधिग्रहणात ज्या देसले बापू एजंटचे नाव आले आहे. त्याच्या गुंडाकडून धमकी मिळाल्याचा धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र यांचा दावा केला आहे. या प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकार बदलले पण धर्मा पाटील यांना न्याय मिळाला नाही !
20 जून रोजी धमकी मिळाल्याच्या तक्रारीची नऊ दिवसानंतर दखल घेतल्याचा पाटील कुटुंबियांचा पोलिसांवर आरोप केला आहे.
23 जानेवारी 2018 रोजी न्याय मिळावा म्हणून मंत्रालयाचे उंबरठे जिझवणारे धर्मा पाटील या 80 वर्षांच्या वृद्ध शेतकऱ्याने विष प्राशान करून मंत्रालयासमोर आत्महत्या केली होती.
मंत्रालयात शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी 15 लाख रुपयांची नुकसान भरपाई कुटुंबानं नाकारली
धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात या शेतकऱ्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्या बाबत धर्मा पाटील यांनी गेले तीन महिन्यापासून पाठपुरावा सुरू केला होता.मात्र त्यांना लवकर भरपाई मिळू न शकल्याने हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी तातडीने या शेतकऱ्याला जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात धर्मा पाटील यांच्यावर उपचारादरम्यान मृत्यू झाला.