• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • आग्रा याठिकाणी भीषण अपघात, ट्रक आणि स्कॉर्पिओच्या धडकेत 8 जण जागीच ठार

आग्रा याठिकाणी भीषण अपघात, ट्रक आणि स्कॉर्पिओच्या धडकेत 8 जण जागीच ठार

Up Agra Accident: आग्रा याठिकाणी झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी आहेत

 • Share this:
  आग्रा, 11 मार्च: उत्तर प्रदेशच्या आग्रा याठिकाणाहून (Agra News) अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते आहे. याठिकाणी झालेल्या एका अपघातात 8 जणांचा (8 Killed in Agra Accident) जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या 8 जणांना जीव गमवावा लागला तर 4 जण जखमी झाले आहेत. ट्रक आणि स्कॉर्पिओची जोरदार धडक (Truck and Scorpio Accident) झाल्यामुळे ही घटना घडली आहे.  ठाणे एटमादुद्दोलाच्या मंडी समितीजवळ ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती बिहारच्या गयामधील आहेत. तर या गाडीचा रजिस्ट्रेशन क्रमांक झारखंडमधील असल्याचंही समोर आलं आहे. स्कॉर्पिओमध्ये असणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. स्कॉर्पिओ ट्रकमध्ये घुसल्याचे काही व्हिडीओ आणि फोटो देखील समोर आले आहेत. दरम्यान ज्या 4 व्यक्ती जखमी आहेत त्यांची परिस्थिती देखील गंभीर आहे. एसपी सिटी बोत्रे रोहन प्रमोद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चार जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक नागालँडचा आहे आणि कारचा नोंदणी क्रमांक झारखंडचा आहे' पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या अपघाताबाबत तपास सुरू आहे. दरम्यान आठही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत तर जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: