दिल्ली, 22 जून : दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी Coronavirus संदर्भातले रुग्ण हाताळण्यासाठी आता नवं धोरण अंमलात आणायचं ठरवलं आहे. दिल्लीत प्रत्येक COVID-19 रुग्णाला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन बंधनकारक करण्यावरून वाद सुरू होते. दिल्लीच्या आप सरकारनेच त्याला विरोध केला होता. आता पुन्हा एकदा होम क्वारंटाइनवर अधिक परिणामकारक करण्यासाठी नवा उपाय योजला आहे. स्वतःच्या घरातच विलगीकरणात राहणाऱ्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचं प्रमाण सतत मोजता यावं यासाठी pulse oximeter देण्यात येणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, HOME Quarantine असणाऱ्या रुग्णांना पल्स ऑक्सिमीटर देण्यात येतील. दर काही तासांनी ऑक्सिजन लेव्हल त्यांनी घरच्या घरी चेक करणं आवश्यक आहे. ऑक्सिजन पाताळी खालावली तर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणं सोपं जाईल, असं केजरीवाल म्हणाले.
'ही' 3 औषध कोरोनाला हरवणार, जाणून घ्या कोणत्या रुग्णांवर होणार उपचार
रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांनी हे ऑक्सिमीटर सरकारला परत द्यावेत, अशी ही योजना आहे.
All those under home-isolation will be provided with pulse oximeters to measure your oxygen levels every few hours. Once you are well, you can return it to the govt: Delhi CM Arvind Kejriwal #COVID19 pic.twitter.com/fz0qv563qo
— ANI (@ANI) June 22, 2020
दिल्ली सरकारने COVID चाचण्यांची संख्यासुद्धा तिपटीने वाढवली आहे. आता दिल्लीच्या कुठल्याही नागरिकाला कोरोनाची चाचणी करून घ्यायला अडचण येणार नाही, असा दावा केजरीवाल यांनी केला. सुरुवातीला दररोज 5000 टेस्ट केल्या जात होत्या. आता तीच संख्या दररोज 18,000 एवढी झाल्याचं त्यांनी सांगितलं.
देशात कोरोनाचा (Coronavirus in India) कहर थांबता थांबत नाही आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 14 हजार 821 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 445 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील कोरोनाबाधितांच्या संख्या 4 लाख 25 हजार 282 झाली आहे.
सध्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 1 लाख 74 हजार 387 झाली आहे. तर, 2 लाख 37 हजार 196 रुग्ण निरोगी झाले आहे. मृतांची एकूण संख्या 13 हजार 699 झाली आहे. आनंददायी बातमी म्हणजे सर्वात जास्त लोकं निरोगी झाली आहेत. देशात आतापर्यंत 68 लाखांहून अधिक लोकांची चाचणी झाली असून आतापर्यंत 55.80% लोकं निरोगी झाली आहेत.
संकलन- अरुंधती
मंदिरात पुजारी नाही तर डिस्पेन्सर देणार तीर्थ; पाहा VIDEO
अनलॉक नको रे बाबा! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात व्यापाऱ्यांनीच केले 'शटरडाऊन'