Home /News /national /

मंदिरात पुजारी नाही तर डिस्पेन्सर देतंय भाविकांना तीर्थ; पाहा VIDEO

मंदिरात पुजारी नाही तर डिस्पेन्सर देतंय भाविकांना तीर्थ; पाहा VIDEO

या मंदिरात आता कुणाचाही हात न लागता तीर्थ मिळतं.

    बंगळुरू, 22 जून : अनलॉकमध्ये देशभरातील धार्मिक स्थळं खुली करण्यात आली. मात्र कोरोनाव्हायरसचा धोका पाहता मंदिरात काही नियमही लागू करण्यात आले आहेत. भाविक दर्शन घेण्यासाठी मंदिरात जात आहेत. मात्र मंदिरात हात लावून घंटा वाजवणं, पुजाऱ्याने तीर्थ-प्रसाद देणं यावर बंदी आहे. मंदिरात गेल्यानंतर घंटानाद केल्याशिवाय आणि बाहेर पडताना तीर्थ घेतल्याशिवाय दर्शन अपुरंच वाटतं. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखूनही हे सर्व कसं करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू झाले. याआधी हात न लावता वाजणारी घंटा एका मंदिरात लागली आणि आता कुणाचाही हात न लागता तीर्थ मिळणार आहे. कर्नाटकातील एका प्राध्यापकाने  तीर्थ डिस्पेन्सर (teertha dispenser) तयार केलं आहे. ज्यामुळे मंदिरात पुजारी किंवा इतर कुणीही आपल्या हाताने तीर्थ न देता भाविकांना तीर्थ मिळतं आहे. नित्ते कॅम्पसमधील महागणपती मंदिरात हे तीर्थ डिस्पेन्सर लावण्यात आलं आहे. मंगळुरूतील प्राध्यापक संतोष यांनी हे तीर्थ डिस्पेन्सर तयार केलं आहे. एएनआयशी बोलताना संतोष यांनी सांगितलं, "जेव्हा भाविक या डिस्पेन्सरखाली हात आणतात, तेव्हा तीर्थ आपोआप त्यांच्या हातावर पडतं. त्यांना हात लावण्याची गरज नाही. हे डिस्पेन्सर तयार करण्यासाठी मला 2,700 खर्च आला. या डिस्पेन्सरचं इन्स्टॉलेशन आणि ते रिफील करणंही खूपच सोपं आहे. त्याच्या मेन्टन्सससाठीदेखील खूप कमी खर्च आहे आणि ऊर्जाही कमी लागते" हे वाचा - हात न लावताच वाजणारी घंटा! कोरोना काळातही मंदिरात घुमणार घंटानाद याआधी मध्य प्रदेशमधील पशुपतिनाथ मंदिरात  (Pashupatinath Temple) अशी घंटा लावण्यात आली आहे, जी हात न लावताच वाजते. संपादन - प्रिया लाड
    First published:

    Tags: Coronavirus, Temple

    पुढील बातम्या