मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अनलॉक नको रे बाबा! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात व्यापाऱ्यांनीच केले 'शटरडाऊन'

अनलॉक नको रे बाबा! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात व्यापाऱ्यांनीच केले 'शटरडाऊन'


2 दिवसांपूर्वी याच बाजारपेठेत सर्व दुकानं खुली असल्यानं प्रचंड गर्दी होती.

2 दिवसांपूर्वी याच बाजारपेठेत सर्व दुकानं खुली असल्यानं प्रचंड गर्दी होती.

2 दिवसांपूर्वी याच बाजारपेठेत सर्व दुकानं खुली असल्यानं प्रचंड गर्दी होती.

नाशिक, 22 जून : नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत झपाट्यानं वाढत चालला आहे. प्रशासनानं जरी बाजारपेठ खुली करण्याचा निर्णय घेतला असला तरी व्यापाऱ्यांनी मात्र स्वयंस्फूर्तीनं लॉकडाऊन सुरू केल्यानं प्रशासन विरुद्ध व्यापारी हा नवा संघर्ष सुरू झाला. नाशिक शहरातील प्रमुख बाजारपेठेत सर्व व्यवहार बंद असल्यानं अक्षरशः शुकशुकाट पसरला आहे. खरं तर हे मार्केट बंद प्रशासनानं केले नाही. तर थेट सर्व व्यापारी संघटनांनी दुकानं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 दिवसांपूर्वी याच बाजारपेठेत सर्व दुकानं खुली असल्यानं प्रचंड गर्दी होती. पण शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.  आता हाच प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व व्यापारी संघटना एकत्र आल्या आहेत. प्रशासन मात्र दुकानं उघडी ठेवली पाहिजे या भूमिकेवर ठाम आहे. पण, व्यापारी संघटनेनं त्यांच्या या भूमिकाला विरोध केला आहे. धनंजय मुंडे यांची कोरोनावर मात; ब्रीच कँडीतून डिस्चार्ज, लवकरच सेवेत होणार रुजू आता तर, 'दुकानं उघडा नाहीतर गुन्हे दाखल करू' असा इशाराच नाशिक प्रशासनाने दिला आहे. मात्र, काहीही झालं तरी गर्दी रोखण्यासाठी, व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.   राज्यात 60 हजार 147 रुग्णांवर उपचार सुरू दरम्यान, राज्यात कोरोनाच्या 3870 नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात 60 हजार 147 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज 1591 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  एकूण संख्या 65 हजार 744 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. अमित ठाकरे झाले आक्रमक, आधी अजित पवारांना पत्र; आता राज्यपालांची भेट! आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 7 लाख 73 हजार 865 नमुन्यांपैकी 1 लाख 32 हजार 75  नमुने पॉझिटिव्ह (17.6 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 66 हजार 719 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या 26 हजार 286 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात 170  कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी 69 मृत्यू हे वर नमूद केल्याप्रमाणे मागील कालावधीतील आहेत. उर्वरित 101 मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- 70 (मुंबई 41, ठाणे मनपा 29), नाशिक-8 (नाशिक 8, अहमदनगर 1), पुणे-14 (पुणे 14), औरंगाबाद-1  लातूर-1, अकोला-7 (अकोला 4, अमरावती 1, बुलडाणा 1, वाशिम १). कोरोनामुळे मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 6170 झाली आहे. संपादन - सचिन साळवे
First published:

Tags: Nashik

पुढील बातम्या