मराठी बातम्या /बातम्या /देश /

देशात 'या' 3 औषधांच्या मदतीनं कोरोनाला हरवणार, जाणून घ्या कोणत्या रुग्णांवर होणार उपचार

देशात 'या' 3 औषधांच्या मदतीनं कोरोनाला हरवणार, जाणून घ्या कोणत्या रुग्णांवर होणार उपचार

देशातील औषध तयार करणाऱ्या कंपन्यांना दोन औषधांच्या तीन जेनेरिक व्हर्जन काढण्यासाठी सरकारकडून मान्यता मिळाली आहे.

देशातील औषध तयार करणाऱ्या कंपन्यांना दोन औषधांच्या तीन जेनेरिक व्हर्जन काढण्यासाठी सरकारकडून मान्यता मिळाली आहे.

देशातील औषध तयार करणाऱ्या कंपन्यांना दोन औषधांच्या तीन जेनेरिक व्हर्जन काढण्यासाठी सरकारकडून मान्यता मिळाली आहे.

नवी दिल्ली, 22 जून : जगभरात कोरोनानं थैमान घातले आहे. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 90 लाखांच्या आसपास झाला आहे. संक्रमित देशांच्या तुलनेत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. यातच देशातील औषध तयार करणाऱ्या कंपन्यांना दोन औषधांच्या तीन जेनेरिक व्हर्जन काढण्यासाठी सरकारकडून मान्यता मिळाली आहे. यात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) रेमडेसिव्हर (remdesivir)आणि फेव्हिपिराविर (favipiravir) औषधांची निर्मिती करणार आहे. जाणून घ्या, ही औषधे कोणती आहेत आणि कोरोना रुग्णांवर त्याचा कसा वापर केला जात आहे. अँटीवायरल ड्रग फेव्हिपिराविर मुंबईच्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने (Glenmark Pharmaceuticals) तयार केले आहे. हे इन्फ्लूएन्झाच्या उपचारांसाठी जपानमध्ये आधीच वापरले जाते. कोव्हिड-19वर या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. ग्लेनमार्कच्या मते, कोरोना रूग्णांच्या उपचारात 88 टक्के रुग्णांना या औषधाचा फायदा झाला. चार दिवसातच व्हायरल लोड, म्हणजेच शरीरातील विषाणूंची संख्या कमी झाली. फेव्हिपिराविर औषधाचा चांगला परिणाम 20 जून रोजी, ग्लेनमार्क या कंपनीने पत्रकार परिषदेत औषध संदर्भात चार क्लिनिकल चाचण्या दिल्या. त्यापैकी 2 चाचण्या चीनमध्ये, एक रशियामध्ये आणि एक जपानमध्ये आहे. चीनमधील एका अभ्यासात 80 रूग्ण घेण्यात आले, त्यांच्या परिणामांचा अभ्यास केला गेला. Lopinavir सारखी इतर औषधे देखील एका ग्रुपला दिली गेली. तुलनात्मक अभ्यासात, हे स्पष्ट झाले की ज्या रुग्णांना फॅबीफ्लू देण्यात येत होते त्यांच्यात व्हायरल लोड कमी झाला. यामुळे रुग्ण लवकर बरा झाला. चीनच्या दुसऱ्या एका अभ्यासात 236 रुग्णांचा सहभाग होता. यामध्येही औषधानं चांगला परिणाम दाखवला. वाचा-भारतात कोरोनावर उपचारासाठी आणखी एका औषधाला मंजुरी; गेमचेंजर ठरणार असल्याचा दावा या रुग्णांवर होणार फॅबीफ्लू औषधाचा वापर या औषधास फॅबीफ्लू (FabiFlu )असे ब्रँड नाव दिले गेले आहे जे टॅबलेट स्वरूपात दिले जाईल. फॅबीफ्लू फक्त कोरोनाची सौम्य आणि सरासरी लक्षणे असलेल्या रूग्णांवरच वापरली जाईल.असा निर्णय देखील घेण्यात आला आहे की रुग्णांनी उपचाराची मंजूरी दिल्यानंतरच या औषधाचा वापर केला जाईल. वाचा-कोरोना हॉटस्पॉट ते मॉडेल; धारावी कसा सोडवतेय कोरोनाचा विळखा? सिप्रमी खात्रीशीर औषध नाही तिसरे औषध सिप्रमी आहे, जे रेमडेसिव्हर प्रमाणेच आहे. फार्मास्युटिकल कंपनी यावर काम करत आहे. सध्या कंपनीने त्याच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती उघड केलेली नाही. ही औषधे कोरोना विषाणूवर खात्रीशीर इलाज नसल्यामुळे, त्यांचा वापर विशेष मार्गाने आणि काही बाबतीत केला जाईल. DCGIच्या मते, रेमडेसिव्हर औषधं केवळ "प्रतिबंधित आणीबाणीच्या वापरासाठी" सुरक्षित असतील. म्हणजेच, जर रुग्णाला या औषधाबद्दल संपूर्ण माहिती दिली गेली आणि त्यानंतर, जर त्याने त्यांच्यावर उपचार करण्यास सहमती दर्शविली तरच रुग्णावर हे औषध वापरलं जाईल. वाचा-81 देशांमध्ये कोरोनाव्हायरसची दुसरी लहर; WHO ने व्यक्त केली चिंता संपादन-प्रियांका गावडे.
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona virus, Corona virus in india

पुढील बातम्या