जाहिरात
मराठी बातम्या / देश / Coronavirus गर्दी हटवण्यासाठी भाजी बाजारात आता नवा सम-विषम प्रयोग

Coronavirus गर्दी हटवण्यासाठी भाजी बाजारात आता नवा सम-विषम प्रयोग

Coronavirus गर्दी हटवण्यासाठी भाजी बाजारात आता नवा सम-विषम प्रयोग

दिल्लीतलं प्रचंड प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी केजरीवाल सरकारने ऑड- इव्हन फॉर्म्युला वापरला होता. आता तसाच प्रयोग भाजी आणि फळ बाजारासाठी करण्यात येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 एप्रिल : राजधानीतलं प्रचंड प्रदूषण रोखण्यासाठी केजरीवाल सरकारने गेल्या वर्षी ऑड इव्हन फॉरम्युला वापरला होता. सम क्रमांकाच्या गाड्याच एका दिवशी रस्त्यावर यावा आणि अशा प्रकारे खासगी वाहतूक निम्म्यावर आणायची ही योजना त्या वेळी वादग्रस्त ठरली होती. पण आता तीच योजना Coronavirus च्या साथीत बाजारातल्या गर्दीवर नियंत्रण मिळवायला वापरली जात आहे.

जाहिरात

दिल्ली सरकारने केलेल्या घोषणेनुसार आता राजधानी फळ विक्री आणि भाजीविक्री सम-विषम तारखांना ठरवून होईल. एक दिवसाआड भाजीबाजार उघडा असेल. तसंच भाज्या आणि फळं एकाच वेळी घाऊक बाजारात विक्रीला नसतील. अशा पद्धतीने मोठ्या घाऊक बाजारपेठेतली गर्दी नियंत्रणात आणता येईल, असं विकास मंत्री गोपाल राय यांनी PTI ला सांगितलं. दिल्ली सरकारने सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत यासाठी 4 विशेष टास्क फोर्स कामाला लावले आहेत. भाजी बाजारातली गर्दी कमी करणं हे यातलं महत्त्वाचं काम आहे, असं राय यांनी सांगितलं. पाहा - सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनही पोलिसांकडून मारहाण, VIDEO आला समोर सकाळी 6 ते 11 या वेळात भाज्या विकल्या जातील आणि दुपारी 2 ते 6 या वेळात फळबाजार खुला होईल. दिल्लीतल्या होलसेल मार्केट म्हणजे घाऊक बाजारपेठेसाठी हे नियम असतली.

छोटे दुकानदार आणि फळभाजी विक्रेते अशांची या बाजारांमध्ये गर्दी होते. ती टाळण्यासाठी वेळा आणि दिवस ठरवून घेण्यात आले आहेत. दिल्ली सरकारने यापूर्वी राजधानीतलं जीवघेणं वायूप्रदूषण कमी करण्यासाठी सम-विषय फॉर्म्युला वापरला होता. सम क्रमांक असणाऱ्या गाड्या एका दिवशी आणि दुसऱ्या दिवशी विषम क्रमांकाच्या गाड्यांनाच रस्त्यावर यायची परवानगी देण्यात आली होती. या प्रयोगाची चर्चा बरीच झाली, पण त्याला म्हणावं तितकं यश मिळालं नव्हतं. अन्य बातम्या 800 अमेरिकन नागरिकांनी दिला भारत सोडण्यास नकार, ‘हे’ आहे कारण कोरोनाच्या संकटात अहमदनगरमध्ये सारी रोगाचा कहर, आतापर्यंत 15 जणांना झाली लागण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात