सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनही पोलिसांकडून मारहाण, VIDEO आला समोर

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनही पोलिसांकडून मारहाण, VIDEO आला समोर

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या डीमार्टच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार नवी मुंबईत घडला आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 13 एप्रिल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस कर्मचारी आव्हानात्मक स्थितीत लढत आहेत. याबाबत त्यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मात्र नवी मुंबईत एक संतापजनक घटना घडली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या डीमार्टच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार नवी मुंबईत घडला आहे.

नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर 4 मधील अमेय सोसायटीमध्ये सोसायटीच्या सदस्यांनी एकत्र येत डीमार्ट मधून जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा मागितला होता. त्यानंतर डीमार्टचा टेम्पो सामान घेऊन सोसायटी आवारात आला असता सामान उतरवतेवेळी पोलिसांनी मारहाण केली. सोसायटीचे सदस्य देखील बाहेर न जाता सोसायटी आवारातच सोशल डिस्टनसिंग ठेवत सामान खरेदी करत असताना देखील पोलिसांची मुजोरी पाहायला मिळाली.

यावेळी काँग्रेसच्या रवींद्र सावंत यांनी पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नेरुळ पोलिसांनी केलेल्या या मारहाणीच्या विरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. एका बाजूला मॉलमध्ये हजारोंच्या संख्येने लोकं जमा होत आहेत, म्हणून ही संकल्पना राबवली. मात्र त्याला पोलिसांनी विरोध केला.

पोलिसांचं हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. एकीकडे पोलिसांच्या मेहनतीचं आणि सहकार्याचं सर्वत्र स्वागत होत असताना सदर घटनेमुळे पोलिसांप्रति नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 13, 2020, 1:50 PM IST

ताज्या बातम्या