800 अमेरिकन नागरिकांनी दिला भारत सोडण्यास नकार, 'हे' आहे कारण

800 अमेरिकन नागरिकांनी दिला भारत सोडण्यास नकार, 'हे' आहे कारण

मात्र भारतात अडकलेल्या अमेरिकन नागरिकांनी मायदेशी जाण्यास नकार दिला आहे. 800 अमेरिकन नागरिकांना मायदेशी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र त्यांनी मायदेशी परतण्यास नकार दिला.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 एप्रिल : कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. आतापर्यंत जगभरात 1 लाख 14 हजार 215 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. अमेरिका आणि युरोपातील देशांना कोरोनाने हादरून सोडले आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे सर्व देशांनी विमानसेवा बंद केल्या आहेत. केवळ परदेशात अडकलेल्या लोकांना त्यांच्या मायदेशी घेऊन जाण्यासाठी विशेष सेवा दिली जाते. मात्र भारतात अडकलेल्या अमेरिकन नागरिकांनी मायदेशी जाण्यास नकार दिला आहे. 800 अमेरिकन नागरिकांना मायदेशी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र त्यांनी मायदेशी परतण्यास नकार दिला.

याआधी भारताने ब्रिटनच्या नागरिकांना मायदेशी पाठवण्यासाठी विशेष चार्टड विमान पाठवले होते. तर, ऑस्ट्रेलियाच्या 444 नागरिकांना विशेष विमानाने मायदेशी पाठवण्यात आले. अमेरिकेने सुद्धा आपल्या नागरिकांना मायदेशी घेऊन जाण्यासाठी व्यवस्था केली होती. मात्र या नागरिकांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली. याचे कारण आहे, अमेरिकेत होत असलेला कोरोनाचा उद्रेक.

वाचा-कोरोनाच्या संकटात अहमदनगरमध्ये सारी रोगाचा कहर, आतापर्यंत 15 जणांना झाली लागण

तब्बल 800 नागरिकांना मायदेशी परत घेऊन जाण्यासाठी अमेरिकन सरकारने विशेष विमानं पाठवण्याची सोय केली होती. मात्र 800 पैकी केवळ 10 नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. भारतात अजूनही 24 हजार अमेरिकन नागरिक असल्याची माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली.

वाचा-लॉकडाउनमध्ये 'उडता पुणे', गांज्यासाठी तरुणांनी 'जे' केलं ते ऐकून पोलीसही हादरले

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार

अमेरिकेत दिवसेंदिवस कोरोनामुळे मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. अमेरिकेत 5 लाख 61 हजार 103 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, जवळजवळ 22 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क राज्यात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूमुळे 758 लोकांचा मृत्यू झाला. न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू कुमो यांनी, ही संख्या फारशी कमी नाही परंतु त्यात थोडी कमतरता आहे. न्यूयॉर्क राज्यात कोव्हिड-19मुळे 1 लाख 80 हजार 458 पेक्षा जास्त लोक संक्रमित आहेत आणि मृतांचा आकडा 9 हजार 385 आहे.

वाचा-'तोड़ देंगे तुम्हारे शरीर का कोना कोना, मगर...', पोलिसांचा हा VIDEO पाहाच

ट्रम्प यांनी आपत्तीकडे केले दुर्लक्ष

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना साथीच्या आजाराच्या धोक्याबद्दल इशारा देण्यात आला परंतु याकडे त्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. उलट अर्थव्यवस्थेकडे जास्त लक्ष केंद्रित केले. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय सुरक्षा सहाय्यक आणि सरकारच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना साथीच्या रोगाचा आणि त्याच्या परिणामाबद्दल चेतावणी दिली होती, परंतु ट्रम्प यांनी या संकटाला कमी लेखले, त्यामुळे अमेरिकेत मृतांचा आकडा वाढला.

First published: April 13, 2020, 2:45 PM IST

ताज्या बातम्या