436 किमीचा प्रवास...या फोटोमागची कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी

436 किमीचा प्रवास...या फोटोमागची कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी

सविता देवी पती गुड्डू यांच्याबरोबर जयपूरमध्ये काम करत होती. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ते बेरोजगार झाले.

  • Share this:

बरेली, 16 मे :  कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 17 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. हा लॉकडाऊन आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यादरम्यान अनेक मजूर बेरोजगार झाले आहेत. हातात पैसे नसल्यानं हे मजूर आपल्या मूळ गावी परत पायी प्रवास करत निघाले आहेत. पायी चालत जाणाऱ्या या मजुरांचे हाल होत असल्याचे अनेक व्हिडीओ फोटो समोर आले आहेत.

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. एक दिव्यांग मजूर महिला काठीच्या आधारे आपल्या पतीसोबत जयपूर ते बरेली असा तब्बल 436 किलोमीटरचा पायी प्रवास करत आहे. ही महिला भरतपूर गावात पोहोचली असताना तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आज तकनं दिलेल्या वृत्तानुसार ही महिला उत्तर प्रदेशातील बरेली इथली रहिवासी आहे. दिव्यांग महिला सविता आपल्या गुड्डू पतीसोबत पायी चालत निघाली आहे.

हे वाचा-लॉकडाऊनमध्ये 900 किलोमीटर जखमी मुलाला खांद्यावरून घरी घेऊन गेले वडील VIDEO

जिद्द आणि घरची ओढ यामुळे बाकी विचार न करता केवळ घर गाठायचं एवढाच उद्देश आणि ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर आहे. सविता या पायानं दिव्यांग असल्या तरी घरी जाण्याची आणि पायी चालण्याची जिद्द सोडली नाही. या कठीण परिस्थितही त्यांनी खंबीरपणे पतीसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यांचा हा फोटो पाहून आपल्याला प्रेरणा मिळते पण तितकच वाईटही वाटतं. हा फोटो आपल्या डोळ्यात पाणी आणणारा आहे.

सविता देवी पती गुड्डू यांच्याबरोबर जयपूरमध्ये काम करत होती. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ते बेरोजगार झाले. हातात होते तेवढे पैसेही संपले त्यामुळे खाण्यापिण्याचे आणि राहण्याचा त्रास होऊ लागला. बरेलीला जाण्यासाठी बस किंवा ट्रक मिळावा म्हणून त्यांनी प्रयत्न केला पण अपयश आलं. अखेर त्या दोघांनीही पायी चालत जाण्यांचा निर्णय घेतला.

हे वाचा-चौथ्या मजल्यावर गॅलरीत बसून मुलांना जेवून घालत होती आई, स्टूलवरून तोल गेला आणि..

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 16, 2020, 2:08 PM IST

ताज्या बातम्या