जाहिरात
मराठी बातम्या / देश / लॉकडाऊनमध्ये 900 किलोमीटर जखमी मुलाला खांद्यावरून घरी घेऊन गेले वडील VIDEO

लॉकडाऊनमध्ये 900 किलोमीटर जखमी मुलाला खांद्यावरून घरी घेऊन गेले वडील VIDEO

लॉकडाऊनमध्ये 900 किलोमीटर जखमी मुलाला खांद्यावरून घरी घेऊन गेले वडील VIDEO

जखमी मुलाला चालता येत नाही म्हणून वडिलांनी खांद्यावरून नेता येईल अशी खाट तयार केली. त्यावर मुलाला झोपवलं आणि वडिलांनी दुसऱ्याच्या मदतीनं ती खांद्यावरून खाट घेऊन तब्बल 900 किलोमीटर प्रवास केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

कानपूर, 16 मे : देशभरात कोरोना व्हायरसचं संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनदरम्यान कामधंदे-उद्योग बंद झाल्यामुळे मजूर बेरोजगार झाले आहेत. मजुरांजवळ पैसे नाहीत आणि खाण्याची भ्रांत असल्यानं मजूर आपल्या मूळ गावी परतत आहेत. काही मजूर चालत तर काही सायकलनं, बैलगाडीनं, ट्रकनं मिळेल तसे घडी जाण्यासाठी धडपड करत आहेत. या लॉकडाऊनदरम्यान अनेक वेदनादायी व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. पंजाबमध्ये काम करणारे मजूर काम नसल्यानं पुन्हा आपल्या मूळ गावी उत्तर प्रदेशात आपल्या घरी परतत आहेत. याच दरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जखमी मुलाला चालता येत नाही म्हणून वडिलांनी खांद्यावरून नेता येईल अशी खाट तयार केली. त्यावर मुलाला झोपवलं आणि वडिलांनी दुसऱ्याच्या मदतीनं ती खांद्यावरून खाट घेऊन तब्बल 900 किलोमीटर प्रवास केला. पंजाब ते कानपूर असा तब्बल 900 किलोमीटरचा पायी प्रवास त्यांनी केला.

जाहिरात

हे वाचा- धारदार शस्त्रांसह दोन गट भिडले, हत्येचा LIVE VIDEO आला समोर एकीकडे बैल नाही म्हणून तरुणानं बैलगाडीला स्वत:ला जुंपून आपल्या कुटुंबाला घरी घेऊन जात होता. तर एक महिला आपल्या थकलेल्या चिमुकल्याला सूटकेसवर झोपवून खेचून घेऊन जात होती. कुठे 11 वर्षांचा मुलगा सायकल रिक्षा चालवत आपल्या वडिलांना घेऊन जाताना पाहायला मिळाला तर 9 महिन्यांचं तान्हुलं कडेवर घेऊन बॅग खेचत जाणाऱ्या महिलेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ही दृश्यं अंगावर काटा आणणारी आहेत. 900 किलोमीटर असं खांद्यावर कावडीसारखी खाट तयार करून ती घेऊन पायी प्रवास करणाऱ्या या मजुरांची अवस्था काय झाली असेल याचा विचार करूनच अंगावर काटा येतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. मजुरांची ही दुरावस्था दिसत नाही का? असे सवालही उपस्थित केले जात आहेत. हे वाचा- चालत जाणारे मजूर पाहून अखेर मोदी सरकारला फुटली पाझर, राज्यांना केली ‘ही’ सूचना संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात