Home /News /mumbai /

चौथ्या मजल्यावर गॅलरीत बसून मुलांना जेवू घालत होती आई, स्टूलवरून तोल गेला आणि....

चौथ्या मजल्यावर गॅलरीत बसून मुलांना जेवू घालत होती आई, स्टूलवरून तोल गेला आणि....

चौथ्या मजल्यावरील गॅलरीत बसून आई आपल्या दोन्ही मुलांना जेवू घालत होती. सव्वा वर्षाच्या वेदला स्टूलवर बसवले होते.

नागपूर, 16 मे : आई आपल्या लेकरांचा सांभाळ करण्यासाठी जीवाचे रान करते. दिवसभर त्यांची देखभाल करण्यात सर्वस्वपणाला लावते. परंतु, दोन मुलांना जेवू घालत असताना चौथ्या मजल्यावरून पडून सव्वा महिन्याच्या बाळाचा करूण अंत झाल्याची दुर्दैवी घटना नागपूरमध्ये घडली. नागपूमधील दवलामेटीतील हिल टॉप कॉलनी इथं ही ह्रदयद्रावक घटना शुक्रवारी घडली. आपल्या डोळ्यादेखत सव्वा महिन्याच्या वेदचा मृत्यू झाल्यामुळे आईला मोठा धक्का बसला आहे. हेही वाचा - धारदार शस्त्रांसह दोन गट भिडले, हत्येचा LIVE VIDEO आला समोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दवलामेटी हिलटॉप कॉलनी येथील रहिवासी सुरेश सलामे यांचा मुलगा वेद हा सव्वा वर्षाचा आहे. सुरेश सलामे हे मेघालय सीमेवर बीएसएफ पोलीस विभागामध्ये कार्यरत आहेत. पत्नी आपल्या दोन मुलांसमवेत दवलामेटीतील हिलटॉप कॉलनी मध्ये राहते. दररोज प्रमाणे शुक्रवारी सकाळी चौथ्या मजल्यावरील  गॅलरीत बसून आई आपल्या दोन्ही मुलांना जेवू घालत होती. सव्वा वर्षाच्या वेदला स्टूलवर बसवले होते. अचानकपणे वेदचा स्टुलवरील ताबा सुटला आणि चौथ्या मजल्यावरून तो खाली पडला. मुलाला खाली पडताना पाहून आईने एकच आक्रोश केला. शेजाऱ्यांना आरडाओरडा करून मदत मागितली. शेजार्‍यांनी धाव घेऊन वेदला ताबडतोब उचलले आणि नागपूरच्या धंतोली येथील खासगी रुग्णालयात नेले. हेही वाचा - लॉकडाउन 4.0 मध्ये होणार बदल, 'या' मुद्यांवर राज्य सरकार घेणार निर्णय वेदचा श्वासोच्छवास चालू होता त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने चिमुकल्याला आयसीयूमध्ये दाखल केले. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच होता. अर्ध्या तासातच वेदने प्राण सोडला. वेदच्या मृत्यूमुळे आईने हॉस्पिटलमध्ये हंबरडा फोडला. आईचा आक्रोश पाहून उपस्थितीचेही डोळे पाणावले. धंतोली पोलिसांनी या घटनेची माहिती वाडी पोलीस स्टेशनला दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: नागपूर

पुढील बातम्या