नवी दिल्ली, 25 एप्रिल : भारतात Coronavirus चा संसर्ग सुरू झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी रुग्णवाढीचा दर मंदावल्याचं चित्र आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवार सकाळपासूनच्या 24 तासात देशभरात 1,429 रुग्ण वाढले. ही वाढ गेल्या अनेक दिवसांतली कमी आहे. आतापर्यंत देशात कोरोनाने 779 बळी घेतले आहेत. देशात सध्या कोरोनारुग्णांची संख्या 24,942 झाली आहे. COVID-19 च्या चाचणीचं प्रमाण वाढल्यानंतरही भारतात कोरोनाचे रुग्ण आवाक्याबाहेर वाढलेले नाहीत, ही चांगली गोष्ट आहे, असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.
India's total number of #Coronavirus positive cases rises to 24,942 (including 18,953 active cases, 5210 cured/discharged/migrated and 779 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/6sIlB91A2T
— ANI (@ANI) April 25, 2020
आज मंत्रिमंडळाच्या गटाची बैठक झाली. त्यामध्ये भारतातल्या कोरोनाव्हायरच्या साथीबद्दल चर्चा झाली. देशात सध्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचं प्रमाण 3.1% आहे. हा मृत्यूदर इतर काही देशांच्या तुलनेत कमी आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे. सध्या हे प्रमाण 20 टक्क्यांहून अधिक आहे. हीसुद्धा इतर युरोपीय देशांच्या तुलनेत चांगलं असल्याचं मंत्रिगटाच्या बैठकीत सांगितलं गेलं. वाचा - मुंबईत धोका कायम! प्रतिबंधित क्षेत्रांतही मोठी वाढ, 1000 चा आकडा पार आरोग्यमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग 9.1 दिवस आहे आणि तो हळूहळू वाढतो आहे. कोरोनाची साथ आटोक्यात येत असल्याचं हे चिन्ह मानलं जातं. देशात शुक्रवारनंतरच्या 24 तासात कोरोना रुग्णवाढीचं प्रमाण 6 टक्के राहिलं. ही वाढ गेल्या कित्येक दिवसातली कमी वाढ आहे. पहिल्या 100 रुग्णांनंतर हा रुग्णवाढीचा वेग वाढत होता. तो आता पहिल्यांदाच कमी होतो आहे. वाचा - मुंबई-पुण्यात लॉकडाऊन वाढणार; शहरं जागी व्हायला किमान जून उजाडणार देशात मुबलक प्रमाणात मास्क आणि आरोग्यसेवकांसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध असावी यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आजच्या तारखेला देशात दररोज 1 लाख PPE किट्स आणि N95 मास्क तयार होत आहेत. देशभरात 104 उत्पादकांकडून या किट्स बनवल्या जात आहेत, असं मंत्रालयातल्या सूत्रांनी सांगितलं. अन्य बातम्या Covid 19 रुग्णालयात काम कऱणाऱ्या महिला डॉक्टरला सोसायटीत प्रवेश नाकारला कोरोनाचा धोका वाढल्यानंतर अजित पवार पुण्यात, दिल्या 9 महत्त्वपूर्ण सूचना 6 महिन्यांच्या चिमुरड्याला डिस्चार्ज, आईचा आनंद पाहून तुमचे डोळे पाणावतील!