मुंबई-पुण्यात लॉकडाऊन वाढणार; शहरं जागी व्हायला किमान जून उजाडणार

मुंबई-पुण्यात लॉकडाऊन वाढणार; शहरं जागी व्हायला किमान जून उजाडणार

देशाचा लॉकडाऊन संपला तरी राज्यातल्या हॉटस्पॉटमध्ये टाळेबंदी पुढचा किमान महिनाभर तरी सुरू राहील, असे संकेत सरकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

  • Share this:

मुंबई, 25 एप्रिल : Coronavirus चा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन (India lockdown)सुरू होईल आज महिना झाला. महाराष्ट्रात अजूनही कोरोनाग्रस्तांची संख्या कमी घ्यायचं नाव घेत नाही. त्यामुळे 3 मे पर्यंत देशाचा लॉकडाऊन संपला तरी राज्यातल्या हॉटस्पॉटमध्ये टाळेबंदी पुढचा किमान महिनाभर तरी सुरू राहील, असे संकेत सरकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

राज्य सरकारच्या सूत्रांनुसार, सध्या तरी महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे परिसरात लॉकडाऊन उठवायचा विचार नाही. मुंबई उपनगरं आणि परिसर तसंच पुणे आणि परिसरात किमान जूनपर्यंत लॉकडाऊन सुरू राहू शकेल. या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे लोकल ट्रेन, बस आणि दुकानं सुरू करण्याचं अधिक धोक्याचं ठरू शकतं.

केंद्र सरकारच्या परवानगीनंतरही पुण्यातील दुकाने राहणार बंदच, हे आहे कारण

या दोन शहर परिसरात सातत्याने वाढणाऱ्या कोरोनारुग्णांमुळे महाराष्ट्र राज्य सरकार चिंतेत आहे. कारण ही दोन शहरं राज्याच्या आर्थिक नाड्या पकडून आहेत. आता ही शहरं बंद असताना आर्थिक घडी नीट करण्यासाठी नवा प्लॅन आखायचा राज्य सरकार विचार करत आहे, अशी बातमी इकॉनॉमिक टाईम्सने दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपर्यंत 'या' राज्यामध्ये जमावबंदीचे आदेश कायम

दररोज अंदाजे 200  नवे रुग्ण या दराने मुंबईत कोरोनाचा प्रसार होत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या एकट्या मुंबईतच साडेचार हजारांवर गेली आहे. पुणे महानगर परिसरातही हाच धोका आहे. पुणे, पिंपरी चिंचवड भागात मुंबईनंतर सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत जसा झोपडपट्टी भागात कोरोनाचा प्रसार वेगाने होतो आहे, तसाच पुण्याच्या अरुंद गल्ल्यांच्या दाट लोकवस्तीच्या पेठांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.

साऱ्या शहराला सेवा देणारे श्रमजीवी लोक या वस्त्यांमध्ये राहतात. त्यामुळे ठराविक भागांमध्ये लॉकडाऊन उठवण्याचा पर्यायही पुणे, मुंबईत अशक्य आहे.

अन्य बातम्या

लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन करू शकता खरेदी? असे आहेत सरकारचे नवे आदेश

केरळसह या 8 राज्यांनी जिंकली कोरोनाची लढाई, 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण झाले बरे

First published: April 25, 2020, 3:31 PM IST

ताज्या बातम्या