मुंबईत धोका कायम! प्रतिबंधित क्षेत्रांतही मोठी वाढ, 1000 चा आकडा पार

मुंबईत धोका कायम! प्रतिबंधित क्षेत्रांतही मोठी वाढ, 1000 चा आकडा पार

भायखळा, कुर्ला, अंधेरी पश्चिम, लोअर परेल, अंधेरी पूर्व, मालाड या भागात प्रतिबंधित क्षेत्र जास्त आहेत.

  • Share this:

मुंबई, 25 एप्रिल: देशातील कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोविड -19 (COVID-19)मधील रुग्णांची संख्या 24 हजारांवर पोहोचली आहे तर 775 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 6817 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 840 आहेत जे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्याचवेळी, 301 लोक मरण पावले आहेत.

याशिवाय मुंबईतील धोका लक्षात घेता प्रतिबंधित क्षेत्रातील संख्येतही मोठी वाढ करण्यात आली आहे. भायखळा, कुर्ला, अंधेरी पश्चिम, लोअर परेल, अंधेरी पूर्व, मालाड या भागात प्रतिबंधित क्षेत्र जास्त आहेत. आतापर्यंत मुंबईत 930 प्रतिबंधित क्षेत्र होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यामध्ये वाढ करीत आता मुंबईत 1036 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. सगळ्यात जास्त 107 प्रतिबंधित क्षेत्र अंधेरीत (पश्चिम) आहे तर त्याखालोखाल कुर्ला (106) येथे आहेत.

वरळी, लोअर परेल, एल्फिन्स्टन या जी दक्षिणकप्रभात 94, भायखळा-90 तर तर बांद्रा (पूर्व) 81 प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

हेही वाचा...खाकीतील 'दानवा'चं क्रूर कृत्य, गोरगरिबांना मदत करणाऱ्या युवकांना अमानुष मारहाण

एकूण 183 रेड झोन...

अंधेरी-48

कुर्ला-40

जी दक्षिण--36

बांद्रा पूर्व--33 (बेहरामपाडा)

एस वॉर्ड- 31( भांडुप, विक्रोळी, पवई)

दरम्यान, महापालिकेने यात काही रेड झोन तयार केलेत. जे दाट वस्तीचे आहेत आणि जिथे लॉकडाऊनसाठी पोलिसांच्या हस्तक्षेपाची गरज आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढून 24,506 झाली आहे. यात आतापर्यंत 5063 रूग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. देशात गेल्या 24 तासांत 57 मृत्यू झाले आहेत. या व्यतिरिक्त 1429 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.

हेही वाचा... कोरोनामुळे चार महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू, आई वडील शेवटचं पाहू शकले नाही

दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन (India lockdown)सुरू होईल आज महिना झाला. महाराष्ट्रात अजूनही कोरोनाग्रस्तांची संख्या कमी घ्यायचं नाव घेत नाही. त्यामुळे 3 मे पर्यंत देशाचा लॉकडाऊन संपला तरी राज्यातल्या हॉटस्पॉटमध्ये टाळेबंदी पुढचा किमान महिनाभर तरी सुरू राहील, असे संकेत सरकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

राज्य सरकारच्या सूत्रांनुसार, सध्या तरी महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे परिसरात लॉकडाऊन उठवायचा विचार नाही. मुंबई उपनगरं आणि परिसर तसंच पुणे आणि परिसरात किमान जूनपर्यंत लॉकडाऊन सुरू राहू शकेल. या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे लोकल ट्रेन, बस आणि दुकानं सुरू करण्याचं अधिक धोक्याचं ठरू शकतं.

हेही वाचा... केंद्र सरकारच्या परवानगीनंतरही पुण्यातील दुकाने राहणार बंदच, हे आहे कारण

या दोन शहर परिसरात सातत्याने वाढणाऱ्या कोरोनारुग्णांमुळे महाराष्ट्र राज्य सरकार चिंतेत आहे. कारण ही दोन शहरं राज्याच्या आर्थिक नाड्या पकडून आहेत. आता ही शहरं बंद असताना आर्थिक घडी नीट करण्यासाठी नवा प्लॅन आखायचा राज्य सरकार विचार करत आहे, अशी बातमी इकॉनॉमिक टाईम्सने दिली आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 25, 2020, 4:50 PM IST

ताज्या बातम्या