सावध राहा! भारताला महिना अखेरी आहे खरा धोका; तज्ज्ञांचा इशारा

सावध राहा! भारताला महिना अखेरी आहे खरा धोका; तज्ज्ञांचा इशारा

ही साथ लॉकडाउन काळ संपल्यानंतर वेगाने फैलावू शकते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेमध्ये कोरोना साथ कळस गाठू शकते, असा ICMR मधील तज्ज्ञांचा अंदाज आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 एप्रिल : कोरोनाव्हायरची साथ भारतात सुरू झाली त्याला आता जवळजवळ महिना झाला. सुरुवातीला मोठ्या शहरांपुरता आणि परदेशी प्रवाशांपुरता असलेला संसर्ग गेल्या काही दिवसात देशभर झपाट्याने वाढतो आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या भारतात अजूनही इतर काही देशांच्या तुलनेत कमी आहे. ही साथ दुसऱ्या टप्प्यातच असल्याचं यंत्रणांचं म्हणणं आहे. पण ही साथ लॉकडाउन काळ संपल्यानंतर वेगाने फैलावू शकते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेमध्ये कोरोना साथ कळस गाठू शकते, असा ICMR मधील तज्ज्ञांचा अंदाज आहे.

भारतात या साथीचा कहर (Peak of pendemic) या महिन्याच्या अखेरीला किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे लॉक डाउन संपलं तरी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेच लागणार आहेत. इटली आणि स्पेनमध्ये जे आत्ता घडत आहे तसा वेगाने फैलाव आणि वाढता मृत्युदर रोखायचा असेल तर घरात राहणं याला पर्याय नाही, असं तज्ज्ञ सांगतात. गर्दी टाळली तरच या विषाणूचं संक्रमण आटोक्यात राहील. भारतासारख्या देशात लोकसंख्या आणि राहण्याची पद्धत लक्षात घेता कोरोनाची साथ उग्र रूप धारण करू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

मुंबई एअरपोर्टवर कर्तव्य बजावणाऱ्या 11 जवानांना 'कोरोना', CISF कॉलनी केली सील

सोशल डिस्टन्सिंग आणि संशयित रुग्णांचं विलगीकरण हेच आतापर्यंत या साथीला आवरण्याचे त्यातल्या त्यात प्रभावी उपाय समजले जात आहेत. भारतात वेळीच लॉकडाउन जाहीर झाल्याने या विषाणूच्या फैलावाने अद्याप इटलीसारखं उग्र रूप घेतलेलं नाही. पण लॉकडाउननंतरही नागरिकांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे.

कोरोनाव्हायरचा फैलाव दिल्लीपासून सुरू झाला, पण तो आटोक्यात आहे, असं वाटत असतानाच निजामुद्दीनची घटना समोर आली. या निजामुद्दीन मरकजमुळे दिल्लीत कोरोनारुग्णांची संख्या प्रचंड वाढली. यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेले आकडे धक्कादायक आहेत. दिल्लीत एकूण रुग्णांपैकी तब्बल 67 टक्के रुग्ण तबलिगी जमातचे आहेत.

मुंबईतली ही 9 ठिकाणं आहेत ‘कोरोना’चे ‘हॉटस्पॉट’, आता ड्रोन नजर ठेवणार

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीही या आकडेवारीला पुष्टी देणारी माहिती दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 14 राज्यांमध्ये तबलिगी जमातशी संबंधित 647 कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. हा आकडा गेल्या दोन दिवसातला आहे.

खरं की खोटं : प्रखर सूर्यप्रकाश आणि UV किरणं कोरोनाला नष्ट शकतात का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2020 07:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading