मुंबई, 3 एप्रिल: मुंबई विमानतळावर कर्तव्य बजावणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) आणखी 6 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यापूर्वी 5 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले होते. एकूण 11 जवानांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्टवर कार्यरत असलेल्या सीआयएसएफच्या एका जवानाचा कोरोनाची लागण झाली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नंतर तो नवी मुंबईतील कळंबोली येथील कॉलनीत गेला. नंतर इतर 10 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, पूर्ण पनवेलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 झाली आहे.
हेही वाचा..लाईट बंद करून दिवे लावा... नरेंद्र मोदींच्या आवाहनवर माजी मुख्यमंत्र्यांची टीका
सीआयएसएफच्या 151 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत सहा जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत सीआयएसएफच्या 11 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयातील स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेस अशी माहिती पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.
हेही वाचा..पुण्यात 'सिम्बॉयसिस'च्या मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थिनीची वसतीगृहातच आत्महत्या
बड्या पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
दिवसेंदिवस धोकादायक ठरत चाललेल्या कोरोना व्हायरसने आता मुंबई पोलिसांपर्यंत धडक दिली आहे. मुंबईतील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस उपायुक्ताला करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना बाधित रुग्णाचे ठिकाण सील करताना त्या ठिकाणी पोलीस उपायुक्ताला संसर्ग झाल्याचा संशय आहे. ही माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण पोलीस उपायुक्त कार्यालय सील बंद करण्यात आले आहे. बड्या अधिकाऱ्यालाच कोरोना संसर्ग झाला असल्याने पोलीस उपायुक्त कार्यालयातील सर्व पोलिसांची करोना चाचणी होणार आहे.
हेही वाचा...हातावर होमक्वॉरंटाईनचा शिक्का मारलेले तबलिगी जमातचे 10 जण पुणे जिल्ह्यातून फरार
याआधीच मुंबईतील चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता थेट बड्या पोलीस अधिकाऱ्यालाच या व्हायरसने लक्ष्य केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.