Home /News /viral /

खरं की खोटं : प्रखर सूर्यप्रकाश आणि UV किरणं कोरोनाला नष्ट शकतात का?

खरं की खोटं : प्रखर सूर्यप्रकाश आणि UV किरणं कोरोनाला नष्ट शकतात का?

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत हजारो लोकांटा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस या व्हायरसचं संक्रमण वाढताना दिसत आहे. अशात आता डास चावल्यानंही कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत हजारो लोकांटा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस या व्हायरसचं संक्रमण वाढताना दिसत आहे. अशात आता डास चावल्यानंही कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

इंटरनेट, सोशल मीडियावर कोरोनावर उपचारासंदर्भात अनेक मेसेज फिरत आहेत. यामध्ये कोरोनावर उपचारासाठी अल्ट्रा व्हायलेट किरणांबाबतचा मेसेज व्हायरल होत आहे.

    मुंबई, 03 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरस जितक्या वेगानं पसरतोय तितक्याच वेगानं त्याबद्दलच्या अनेक अफवाही पसरत आहेत. कोरोनावर अद्याप लस सापडलेली नाही. अनेक देश यावर उपचार शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, इंटरनेट, सोशल मीडियावर कोरोनावर उपचारासंदर्भात अनेक मेसेज  फिरत आहेत. यात युजर्सकडून असाही दावा केला जात आहे की, सुर्याच्या प्रकाशात असलेल्या अतिनील किरणं किंवा अतिनील सॅनिटायझर्स कोरोनाला संपवू शकतात. सोशल मीडियावर अनेकांनी हा अल्ट्राव्हायोलेट किरणांचा मेसेज शेअर केला आहे. याशिवाय उन्हाच्या तडाख्यानेही कोरोना मरेल असं म्हटलं आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं वेगळंच सांगितलं आहे. त्यावरून सोशल मीडियावर अल्ट्रा व्हायलेट किरणांबाबत केला जाणाऱ्या दाव्यात तथ्य नसल्याचं दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि इतर संस्थांनी अल्ट्रा व्हायलेट किरणं शरीरासाठी धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. कोरोना व्हायरसला अल्ट्रा व्हायलेट रोगनाशक लँप मारू शकतो का या प्रश्नावर जागतिक आरोग्य संघटनेनं त्यांच्या वेबसाइटवरून उत्तर दिलं आहे. त्यात म्हटलं आहे की, अल्ट्रा व्हायलेट लँपचा वापर हात किंवा त्वचेच्या इतर भागांना सॅनिटाईज कऱण्यासाठी व्हायला नको. कारण यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. कोरोना व्हायरसला अल्ट्रा व्हायलेट किरणं संपवू शकतात का? यावर अमेरिकनं कंपनीसाठी अल्ट्राव्हायलेट टेक्नॉलॉजीवर काम करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच मत व्यक्त केलं आहे. ते म्हणतात की, कोरोनाला अल्ट्राव्हायलेट किरणं निष्क्रिय करू शकतात आणि मात्र ते अत्यंत धोकादायक असं आहे. अल्ट्रा व्हायलेट किरणं तीन प्रकारची असतात. यात तिसरा प्रकार आहे युव्हीसी. यामध्येच कोरोना व्हायरसला संपवण्याची क्षमता आहे. मात्र तो कशाप्रकारे कोरोनाला संपवू शकतो हे समोर आलेलं नाही. हे वाचा : भयंकर... अमेरिकेत शवपेट्याही पडताहेत अपुऱ्या, दिली लाखभर ‘बॉडी बॅग’ची ऑर्डर अभ्यासातून अशी माहिती समोर आली आहे की याचा वापर कोरोना व्हायरस सारख्या सार्सच्या उपचारांवर होऊ शकतो. म्हणूनच युव्हीसी कोरोनाच्या लढ्यामध्ये सर्वात आधी चर्चेत येतो. मात्र याबाबत एक इशाराही संशोधकांनी दिला आहे. युव्हीसी खूप धोकादायक गोष्ट आहे ज्याच्या संपर्कात तुम्ही येता कामा नये. ठराविक पद्धतीनं युव्हीसी किरणांचा वापर करून कोरोना मारता येऊ शकतात. पण युव्हीसी किरणं मानवी शरीराला घातक आहेत. हे वाचा : कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी नगरपंचायतने हाती घेतला अनोखा उपक्रम अल्ट्रा व्हायलेट किरणांशिवाय सुर्याच्या प्रखर उष्णतेबाबतही असाच मेसेज व्हायरल होत आहे. मात्र संशोधकांनी म्हटलं आहे की, सुर्य प्रकाशाच्या माध्यमातून कोरोना मारण्यासाठी किती वेळ लागतो हे माहिती नाही. सुर्य किरणांमध्ये अल्ट्रा व्हायलेट किरणांचे प्रमाण दिवस, ऋतू आणि भौगोलिक स्थान यानुसार ठरते. कोरोना व्हायरसला मारण्यासाठी हा खात्रीचा उपाय ठरू शकत नाही असंही मत संशोधकांनी नोंदवलं आहे. युव्हीसी कोरोनाला संपवू शकत असला तरीही WHO किंवा इतर संशोधकांनी तसा सल्ला दिलेला नाही कारण शरीरासाठी आणि त्वचेसाठी अल्ट्रा व्हायलेट किरणं धोकादायक आहेत. त्यामुळे शरीराला इजा पोहोचू शकते. हे वाचा : Coronavirus : कम्युनिटी ट्रान्समिशनचा सामना करण्यासाठी सज्ज राहा - WHO
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या