मुंबई 03 एप्रिल : मुंबईतला कोरोनाचा प्रकोप दररोज वाढतो आहे. मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये आता लागण होत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. ही कम्युनिटी लागण असल्याचं बोललं जात आहे. मात्र सरकारकडून त्याबाबत काहीही सांगण्यात आलं नाही. प्रचंड लोकसंख्या, दाटीवाटीने असलेल्या इमारती, अरुंद गल्ल्या, अस्वच्छता त्यामुळे या भागात वेगाने कोरोना पसरण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. कोरोनाची लागण लक्षात घेऊन सरकारने 9 हॉटस्पॉट निवडले असून त्या ठिकाणांवर आता सर्व लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचीही नजर ठेवली जाणार आहे. हे आहेत मुंबईतले 9 हॉटस्पॉट गोरेगाव - बिंबिसार नगर धारावी - डॉ. बलिगा नगर धारावी - वैभव बिल्डिंग सायन - जैन सोसायटी सायन कोळीवाडा - पंजाबी नगर बोरिवली - मेरिलँड कॉम्प्लेक्स वरळी - पोलीस कॅम्प वरळी - कोळीवाडा अंधेरी - गिल्बर्ट हिल लाईट बंद करून दिवे लावा… नरेंद्र मोदींच्या आवाहनवर माजी मुख्यमंत्र्यांची टीका दिवसेंदिवस धोकादायक ठरत चाललेल्या कोरोना व्हायरसने आता मुंबई पोलिसांपर्यंत धडक दिली आहे. मुंबईतील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस उपायुक्ताला करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. करोना बाधित रुग्णाचे ठिकाण सील करताना त्या ठिकाणी पोलीस उपायुक्ताला संसर्ग झाल्याचा संशय आहे. ही माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण पोलीस उपायुक्त कार्यालय सील बंद करण्यात आले आहे. बड्या अधिकाऱ्यालाच कोरोना संसर्ग झाला असल्याने पोलीस उपायुक्त कार्यालयातील सर्व पोलिसांची करोना चाचणी होणार आहे. ICMR च्या दाव्यानंतर लॉकडाउनबद्दल सरकार घेणार मोठा निर्णय याआधीच मुंबईतील चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता थेट बड्या पोलीस अधिकाऱ्यालाच या व्हायरसने लक्ष्य केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान, देशभरात गेल्या 24 तासांत Coronavirus मुळे 12 मृत्यू झाले आणि 336 नवे कोरोनाग्रस्त दाखल झाले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाते अधिकारी लव अग्रवाल यांनी शुक्रवारी दिली. देशात कोरोनाबळींची संख्या 56 झाली आहे. हेही वाचा- अमेरिकेत कोरोनाचा कहर, 2 आठवड्यात 1 कोटी लोक झाले बेरोजगार दिल्लीच्या निजामुद्दीन इथे झालेली तबलिगी मरकज देशाभरात कोरोनाव्हायरचा हॉटस्पॉट ठरली आहे. या संमेलनात सहभागी झालेले अनुयायी तिथून देशभर हा संसर्ग घेऊन गेले आणि आता अनेक राज्यांमधून या तबलिगी अनुयायांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 14 राज्यांमध्ये तबलिगी जमातशी संबंधित 647 कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. हा आकडा गेल्या दोन दिवसातला आहे. या नव्या कोरोनाग्रस्तांमुळे देशातल्या कोरोनाग्रस्तांची संख्याही एकदम वाढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.