नवी दिल्ली, 15 एप्रिल : एका बाजूला Coronavirus चा विळखा घट्ट होत असला, तरी त्याविरोधात लढण्याचे मानवी प्रयत्न जोरदार सुरू आहेत, हे काही बातम्यांवरून स्पष्ट होत आहे. या कठीण प्रसंगी अगदी सामान्य परिस्थितीतले लोकही माणुसकीचा विचार करून मोठं काम करत आहेत. या दोन पोलिसांची गोष्ट त्यासाठी महत्त्वाची.
उत्तर प्रदेशातल्या एटा नावाच्या छोट्या शहरात लॉकडाऊनमध्ये कार्यरत असणारे पोलीस शिपाई अमित प्रजापती यांच्या लग्नाची तारीख जवळ आली होती. पण एकूण कोरोनाव्हायरसचा देशभरात पसरलेला संसर्ग पाहता आणि लॉकडाऊनचे नियम लक्षात घेत त्यांनी आपला विवाह पुढे ढकलला. फक्त एवढंच करून अमित थांबले नाहीत, तर लग्नासाठी जमवलेल्या पैशातली निम्मी रक्कम त्यांनी CM Fund मध्ये जमा केली. आता जेव्हा केव्हा लग्न करू तो सोहळा साधेपणाने होईल. म्हणूनच लग्नाच्या खर्चातला 50 टक्के वाटा मी कोरोनाविरोधातल्या लढ्यासाठी द्यायचा ठरवला, असं अमित सांगतात.
अमित यांची वाग्दत्त वधूसुद्धा पोलीस शिपाई आहे. या दोघांचं लग्न 25 एप्रिलला होणार होतं. पण आता ते नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकललं आहे. दोन्ही पोलीस जोडप्याने मिळून हा निर्णय घेतला आहे.
वाचा - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 3 हजारांच्या जवळ, मृत्यूची संख्या 187वर
उत्तराखंडमध्येही काही महिला पोलिसांनी असाच एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. बागेश्वरमध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस उपाधीक्षक संगीता आणि रुद्रप्रयागला ड्युटीवर असणाऱ्या कॉन्स्टेबल कविता यांनी आपला विवाह पुढे ढकलला आहे. आधी कोरोनाविरुद्धचा लढा आणि नंतर आपलं लग्न असं म्हणत त्यांनी आयुष्यातला मोठा निर्णय पुढे ढकलला आहे. पोलिसांच्या या निर्णयाचं कौतुक होत आहे.
वाचा - Plasma Therapy कोरोनावर उपचार होण्याची शक्यता; असं वाचवलं जाणार रुग्णांना
वैयक्तिक आनंदापेक्षा कर्तव्य महत्त्वाचं आणि देशाच्या रक्षणाची जबाबदारी मोठी असं मानत हे पोलीस कर्मचारी कोरोनाशी लढत आहेत.
वाचा - भारतीय वंशाच्या डॉक्टरांनी कोरोना रुग्णांना दिला पोटावर झोपण्याचा सल्ला आणि...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus