• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • न्यूयॉर्कच्या या भारतीय वंशाच्या डॉक्टरांनी कोरोना रुग्णांना दिला पोटावर झोपण्याचा सल्ला आणि...

न्यूयॉर्कच्या या भारतीय वंशाच्या डॉक्टरांनी कोरोना रुग्णांना दिला पोटावर झोपण्याचा सल्ला आणि...

गंभीर कोरोना रुग्णाला (CoronaVirus Patient) पोटावर (Stomach) झोपावल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं दिसून आलं.

 • Share this:
  न्यूयॉर्क, 15 एप्रिल : लाँग आयलंड ज्युइश हॉस्पिटलमध्ये (Long Island Jewish Hospital) दाखल असलेल्या 40 वर्षीय कोरोना रुग्णाची प्रकृती गंभीर होती. त्याला तपासण्यासाठी डॉ. मंगला नरसिंहा यांना फोन आला. त्या नॉर्थवेल हेल्थमध्ये क्रिटिकल केअरच्या प्रादेशिक संचालिका आहेत. डॉ. मंगला यांनी रुग्णाला पोटावर झोपवण्याचा सल्ला दिला. ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र डॉ. मंगला यांनी दिलेला हा सल्ला यशस्वी ठरला. अगदी गंभीर परिस्थितीत असलेल्या या रुग्णाच्या फुफ्फुसामध्ये जास्त ऑक्सिजन मिळण्यास मदत झाली. जेव्हा या रुग्णाला पोटावर झोपवलं तेव्हा त्याच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण 85 टक्क्यांवरून तब्बल 98 टक्क्यांवर पोहोचलं. सीएनएन हे वृत्त दिलं आहे. लॉकडाऊनसाठी नवी नियमावली जाहीर; 'या' सेवांना दिल्या सवलती, तर ट्रेन बंदच राहणार डॉ. नरसिंहा म्हणाल्या, "आम्ही 100 टक्के रुग्णांचा जीव असाच वाचवत आहोत. ही अगदी सोपी गोष्ट आहे आणि यामुळे सुधारणा होत असल्याचं आम्हाला दिसलं आहे. प्रत्येक रुग्णांमध्ये आपण ती पाहू शकतो." संशोधन काय सांगतं? कोरोनाव्हायरसचे रुग्णांचा अनेकदा एक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिन्ड्रोममुळे (Acute Respiratory Distress Syndrome - ARDS) मृत्यू होतो. इन्फ्लुएंझा, न्युमोनियासारखे इतर आजार असलेल्या रुग्णांचाही याच सिन्ड्रोममुळे जीव जातो. 7 वर्षांपूर्वी न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये एका फ्रेंच डॉक्टराचा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यात वेंटिलेटरवर असलेल्या ARDS रुग्णांना पोटावर झोपण्यास सांगितलं तर त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी होते.तेव्हापासून यूएसमध्ये वेंटिलेटरवर असलेल्या ARDS रुग्णांना पोटावर झोपवलं जातं. रुग्णांना नेमका फायदा कसा होतो? तज्ज्ञांच्या मते, पोटावर झोपल्याचा रुग्णाला असा फायदा होतो कारण फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन सहज जातं. जेव्हा रुग्ण पाठीवर झोपतो तेव्हा शरीराच्या भारामुळे फुफ्फुसाचा काही भाग दाबला जातो. Corona शांत झोपूही देईना, स्वप्नातही येऊ लागला, स्वप्नांपासून अशी मिळवा मुक्ती मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटलच्या (Massachusetts General Hospital) मेडिकल आयसीयूचे संचालक डॉ. कॅथ्रीन हिबबर्ट म्हणाले, "रुग्णांना पोटावर झोपवल्याने आपण फुफ्फुसाचा असा भाग उघडण्यास मदत करतो जो आपण कधीच उघडला नव्हता." संकलन, संपादन - प्रिया लाड
  Published by:Manoj Khandekar
  First published: