मुंबई 15 एप्रिल: राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात आज 232 रुग्णांची भर पडली तर 9 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 2916 झाली असून 187 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 52000 तपासणी झाल्या असून त्यातील 48 हजार 198 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सगळ्यात जास्त रुग्ण हे मुंबई आणि ठाण्यात आहेत. राज्यात 5 हजार 394 सर्व्हेक्षण पथकं काम करत असून त्यांनी आत्तापर्यंत 20 लाख लोकांचा सर्व्हे केल्याची माहितीही देण्यात आली आहे.
पुण्यात कोरोनाची व्याप्ती वाढत आहे. आज नव्या 51 रुग्णांची भर पडली. तर 4 जणांचा मृत्यू झाला. वानवडी, हडपसर, मुंढवा आणि कोंढवा या पोलीस परिमंडळातील आणखी परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याचा आता मोठा भाग सील झालाय. विभागातील 68 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे विभागातील एकूण रुग्ण संख्या 472 वर गेली आहे. आज ज्यांचा मृत्यू झाला त्यात एका 34 वर्षांच्या युवकाचाही समावेश आहे. त्याचा ससूनमध्ये मृत्यू झाला.
देशात आत्तापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 11,933वर गेली आहे. तर 392 जणांचा मृत्यू झालाय. 1344 जण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 118 नवीन प्रकरणे तर 24 तासांत 39 जणांचा मृत्यू झाला. चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर जगातल्या ज्या मोजक्या देशांनी उपाय योजना सुरू केली त्यात भारताचा समावेश होता असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे.
वांद्रे गर्दीचं कारण ठरलेली अफवा 11 मार्गांनी पसरवली गेली, पोलिसांकडून कारवाई
ते म्हणाले, चीनमध्ये 7जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर 8 जानेवारीला आम्ही तज्ज्ञांची बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आणि उपाय योजनांना सुरुवात केली असा दावाही त्यांनी केला आहे. कोरोना व्हायरसच्या आव्हानाविरुद्ध लढण्यासाठी सरकारी पातळीवरून शक्य तितक्या सर्व पर्यायांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भारतीय वंशाच्या डॉक्टरांनी कोरोना रुग्णांना दिला पोटावर झोपण्याचा सल्ला आणि...
कोरोना व्हायरसच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आधी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या लॉकडाऊनच्या कालावधीत आता वाढही करण्यात आली आहे. त्यानंतर आता मोदी सरकारने त्रिस्तरीय यंत्रणा तयार केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.