मुंबई, 15 एप्रिल : कोरोनाव्हायरसने (CoronaVirus) जगभरात हाहाकार माजवला आहे. याचा नाश करणारं औषध आणि लस तयार करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप उपचार सापडलेला नाही. सध्या इतर आजारांवरील औषधांचा वापर करून उपचार केले जात आहेत. अशात आता कॉन्वलेसंट प्लाझ्मा थेरेपी (Convalescent plasma) या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. Convalescent plasma ही उपचारपद्धती कोरोनाव्हायरस रुग्णांवर यशस्वी ठरत असल्याचं अनेक अभ्यासात दिसून आलं आहे. महाराष्ट्रातही याच उपचारपद्धतीने कोरोनाव्हायरस रुग्णांवर उपचार केली जाण्याची शक्यता आहे. प्लाझ्मा थेरेपीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. काय आहे कॉन्वलेसंट प्लाझ्मा थेरेपी? याआधी एबोलासारख्या आजारावर वापरण्यात आलेली ही उपचार पद्धती कोविड-19 वरही परिणामकारक ठरत असल्याचं आता काही अभ्यासात दिसून आलं आहे. या उपचार पद्धतीत ब-या झालेल्या कोरोनाव्हायरसच्या रुग्णांचं रक्त इतर कोरोना रुग्णाला दिलं जातं. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांवर याच पद्धतीने उपचार करण्यात आले. 5 रुग्ण बरे झालेत, त्यामध्ये 3 भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे. ह्युस्टनमधील बेलर सेंट ल्युक मेडिकल सेंटरमध्ये 5 रुग्ण भरती होते.
In Mumbai and Pune, we are taking extra precautions. This includes increasing tests and testing centres, containment zones and quarantining those who have come in contact with corona positive cases, and isolating them based on symptoms to prevent transmission.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 14, 2020
याबाबत ANI ला अधिक माहिती देताना दिल्लीतील एम्सचे रणदीप गुलेरिया म्हणाले, “कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याच्या रक्तात या अँटिबॉडीज कायम असतात. अशा व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोना रुग्णाच्या शरीरात सोडले जातात. जेणेकरून त्या प्लाझ्मातील अँटिबॉडीज रुग्णाच्या शरीरातील व्हायरसशी लढतील.” “याला सरकारकडून परवानगी मिळाल्यास मोठ्या संख्येने रुग्णांवर ही उपचार पद्धती वापरून त्यांना वाचवता येईल. मात्र त्यासाठी कोरोनावर मात केलेल्या रुग्णांनी रक्तदान करणं गरजेचं आहे”, असंही गुलेरिया म्हणाले. लॉकडाऊनसाठी नवी नियमावली जाहीर; ‘या’ सेवांना दिल्या सवलती, तर ट्रेन बंदच राहणार Corona शांत झोपूही देईना, स्वप्नातही येऊ लागला, स्वप्नांपासून अशी मिळवा मुक्ती संकलन, संपादन - प्रिया लाड