• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • cm uddhav thackery and pm modi meets : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधानांच्या भेटीचा फोटो आला समोर

cm uddhav thackery and pm modi meets : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधानांच्या भेटीचा फोटो आला समोर

राज्य शासनाने केंद्र सरकारकडे जीएसटी थकीत 24 हजार 400 कोटी थकीत रक्कम तात्काळ द्यावी अशी मागणी पीएम यांच्याकडे वित्त मंत्री अजित पवार यांनी निवेदनद्वारे केली.

 • Share this:
  नवी दिल्ली, 08 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) आणि अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो आता समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानी गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयाने या भेटीचा पहिला फोटो ट्वीट केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधानांच्या उजव्या बाजूला बसले आहे, तर समोरील सोफ्यावर अशोक चव्हाण आणि अजित पवार बसलेले आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे ठाकरे सरकारने तातडीने यावर तोडगा काढता यावा यासाठी मोदी सरकारकडे मागणी केली होती. त्यामुळेच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण हे आज सकाळीच मुंबईहून दिल्लीला विशेष विमानाने रवाना झाले होते. सकाळी 9 च्या सुमारास दिल्ली विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र सदनाकडे जाणार होते. पण पंतप्रधान मोदी यांच्या निवास्थानाकडे जाण्यास उशीर होत असल्यामुळे  महाराष्ट्र सदनात न जाता थेट पंतप्रधानांच्या निवास्थानाकडे रवाना झाले. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सकाळी 11 वाजेच्या सुमारास भेट झाली. जवळपास तासाभरापासून ही बैठक सुरू आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण देखील उपस्थित होते आहे. या भेटीनंतर पत्रकार परिषद देखील होणार आहे. दिव्यांग व्यक्तींना मिळणार मुंबईत हक्काचे घर, जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा त्याचबरोबर, राज्य शासनाने केंद्र सरकारकडे जीएसटी थकीत 24 हजार 400 कोटी थकीत रक्कम तात्काळ द्यावी अशी मागणी पीएम यांच्याकडे वित्त मंत्री अजित पवार यांनी निवेदनद्वारे केली. 'ते' पत्र चोरण्यासाठी अजितदादांसोबत भाजपचे कोण कोण लोक होते? सेनेचा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधी सुद्धा पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून राज्यासाठी मदत मागितली होती. पण अजूनही केंद्राकडून पुरेशी मदत मिळाली नसल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला . एवढंच नाहीतर हक्काचे असलेली जीएसटीचा परतावा सुद्धा केंद्र सरकारने दिलेला नाही, त्यामुळे काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी याबद्दल मागणी केली होती. आता या भेटीतून महाराष्ट्राच्या वाट्याला काय हाती लागते हे पाहण्याचे ठरणार आहे.
  Published by:sachin Salve
  First published: