मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

दिव्यांग व्यक्तींना मिळणार मुंबईत हक्काचे घर, जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा

दिव्यांग व्यक्तींना मिळणार मुंबईत हक्काचे घर, जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा

'5 टक्के घरे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून भविष्यात निर्माण होणाऱ्या सर्व प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू...'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 08 जून: मुंबईत (Mumbai) घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या यादीत आता दिव्यांग व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे.  म्हाडाच्या लॉटरीमध्ये (MHADA lottery) 5 टक्के घरं दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव असणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे.

मुंबईत प्रत्येकाचे हक्काचे घर असावे, यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. त्यातच म्हाडाची लॉटरी सर्वात परवडणारी अशीच असते. दिव्यांग व्यक्तींनाही या लॉटरीत सहभागी होता यावे म्हणून आता दिव्यांग प्रवर्गाची घोषणा करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून याबद्दल माहिती दिली आहे.

'म्हाडा लॉटरी मध्ये आता 5 टक्के घरे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव ठेवले जाणार आहे, गृहनिर्माण विभागातील सर्व प्रकल्प निर्णय लागू असेल', अशी माहिती आव्हाड यांनी दिली.

OMG! सोशल मीडियावर VIDEO पाहून लावला फेस मास्क; तिच्या चेहऱ्याचं काय झालं पाहा

त्याचबरोबर, गृहनिर्माण मंत्रालयाच्या म्हाडा तर्फे उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पातील 5 टक्के घरे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या भविष्यात निर्माण होणाऱ्या सर्व प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू असणार आहे, असंही आव्हाड यांनी सांगितलं.

मुंबईत 4000 घरांची लॉटरी!

दरम्यान, दिवाळीत मुंबईतल्या चार हजार घरांसाठी लॉटरी (mhada lottery 2021) काढली जाणार आहेत. मुंबईत घर घेणाऱ्या मुंबईत दिवाळीत चार हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे यापैकी जवळपास 3400 घर ही एकट्या गोरेगावमध्ये असतील.

चहाबरोबर ‘हे’ पदार्थ आवडतं असले तरी मोह आवरा; Cancer चा धोका वाढेल

म्हाडाच्या जागेवर ही घर बांधली गेली असल्याने मागच्या अशा अनेक वर्षातील घरांच्या किंमतीपेक्षा बऱ्यापैकी कमी किंमत असण्याची शक्यता वर्तवली  जात आहे. विशेष म्हणजे, गोरेगाव आयटी पार्कपासून ही जागा जवळ असल्याने बर्‍यापैकी प्राईम लोकेशन आहे.

First published: