Home /News /national /

Company Gifted Cars to employees : कंपनी कर्मचाऱ्यांवर खुश! तब्बल 100 जणांना मारुती कार दिली भेट, म्हणाले..

Company Gifted Cars to employees : कंपनी कर्मचाऱ्यांवर खुश! तब्बल 100 जणांना मारुती कार दिली भेट, म्हणाले..

विवेकानंदन म्हणाले, 'आम्ही काही वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांना वचन दिलं होतं की, आम्ही आमचा पैसा आणि नफा त्यांच्यासोबत शेअर करू. ज्यामध्ये कार गिफ्ट करणं ही पहिली पायरी आहे. आगामी काळात आम्ही असे आणखी उपक्रम राबवू.'

  नवी दिल्ली, 12 एप्रिल : एका सॉफ्टवेअर कंपनीनं (Chennai Software Company) अलीकडेच आपल्या पाच विश्वासू कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची BMW भेट देऊन लोकांना आश्चर्यचकित केले. अशाच पद्धतीनं चेन्नईतल्या आणखी एका IT फर्मने आपल्या 100 कर्मचाऱ्यांना 100 मारुती कार गिफ्ट (Gifted 100 Maruti Cars to 100 Employees) केल्या आहेत. कंपनी Ideas2IT ने मंगळवारी एका निवेदनात सांगितलं की, कंपनी गेल्या 10 वर्षांपासून कंपनीचा भाग असलेल्या 100 कर्मचाऱ्यांना 100 कार भेट देत आहे. कंपनीच्या 500 कर्मचाऱ्यांच्या गटात अनेक आशादायक सदस्य आहेत. भेट मेहनतीचे फळ एएनआयच्या वृत्तानुसार, कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ मुरली विवेकानंदन यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, 'आम्ही गाड्या गिफ्ट (Gift) करत नाही, तर कर्मचाऱ्यांनी आपल्या मेहनतीने या गाड्या मिळवल्या आहेत.' ते म्हणाले की, कर्मचार्‍यांनी देशाला ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत आणण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. हे वाचा - बॉस असावा तर असा; आयटी कंपनीच्या CEOने कर्मचाऱ्यांना दिली BMW कार
   पुढे आणखीही काही असेच सुखद क्षण असतील
  विवेकानंदन म्हणाले, 'आम्ही काही वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांना वचन दिलं होतं की, आम्ही आमचा पैसा आणि नफा त्यांच्यासोबत शेअर करू. ज्यामध्ये कार गिफ्ट करणं ही पहिली पायरी आहे. आगामी काळात आम्ही असे आणखी उपक्रम राबवू.' हे वाचा - बॉस पाहिजे तर असा! कंपनी नफ्यात असल्यानं कर्मचाऱ्यांनाही केलं मालामाल
   iPhone आणि सोन्याची नाणी याआधीच दिली आहेत
  कंपनीचं गिफ्ट मिळाल्यानंतर कर्मचारीही खूश आहेत. एका कर्मचारी प्रशांत म्हणाला, 'आम्हाला कंपनीनं यापूर्वीच आयफोन आणि सोन्याची नाणी यांसारख्या भेटवस्तू दिल्या आहेत. कार ही खरोखरच एक उत्तम भेट आहे आणि यासाठी आम्ही आमच्या व्यवस्थापनाचे मनापासून आभार मानतो.' हे वाचा - IndiGo Airlinesची भरारी! बनली जगातली सहावी सर्वांत मोठी विमान कंपनी
   कंपनी खूप मोठी आहे
  Ideas2IT कंपनीनं निवेदनात म्हटलंय की, ही एक उच्च श्रेणीतील उत्पादन करणारी अभियांत्रिकी कंपनी आहे, ज्याचं मुख्यालय चेन्नई इथं आहे आणि तिचे उच्च श्रेणीचे ग्राहक आहेत. कंपनीच्या ग्राहकांमध्ये फेसबुक, मोटोरोला, ओरॅकल, ब्लूमबर्ग आणि मायक्रोसॉफ्ट यांचा समावेश आहे. कंपनीने 2009 मध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये 6 कर्मचार्‍यांसह एक फर्म देखील सुरू केली आणि आता अमेरिका, भारत आणि मेक्सिकोमध्ये कार्यालये आहेत.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Iphone, Maruti suzuki cars

  पुढील बातम्या